भारतीय नेमबाजांची सरावास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

भारतीय नेमबाजांनी क्रोएशियातील आपल्या ऑलिंपिक स्पर्धा सरावास सुरुवात केली आहे. ११ मे रोजी झॅग्रेबला दाखल झालेल्या भारतीय नेमबाजी संघाचे विलगीकरण मंगळवारी संपले आणि नेमबाजांनी सराव सत्रात पहिल्या दिवशी चार तास सराव केला.

मुंबई - भारतीय नेमबाजांनी क्रोएशियातील आपल्या ऑलिंपिक स्पर्धा सरावास सुरुवात केली आहे. ११ मे रोजी झॅग्रेबला दाखल झालेल्या भारतीय नेमबाजी संघाचे विलगीकरण मंगळवारी संपले आणि नेमबाजांनी सराव सत्रात पहिल्या दिवशी चार तास सराव केला.

आम्ही गेल्याच आठवड्यात क्रोएशियात आलो असलो तरी आम्हाला विलगीकरणास सामोरे जावे लागले. मात्र बुघवारी सकाळी सर्वच नेमबाजांचा चांगला सराव झाला, असे भारतीय नेमबाजी संघातील मार्गदर्शकांनी सांगितले. या सरावापूर्वी संघातील सर्वांची कोरोना चाचणी झाली. त्यात सर्व निगेटीव आल्याने ठरल्यानुसार सरावास मंजुरी मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या