भारतीय बॉक्सरचाही करताहेत परदेशात सराव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस पात्र ठरलेल्या भारतीय नेमबाजाचे ऑलिंपिक पूर्व सराव शिबिर क्रोएशियात सुरू आहे. आता त्यापाठोपाठ भारतीय बॉक्सिंग संघही परदेशात तीन आठवडे सराव करून जपानला जाणार आहे. बॉक्सिंग स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक आठवडा भारतीय संघ जपानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस पात्र ठरलेल्या भारतीय नेमबाजाचे ऑलिंपिक पूर्व सराव शिबिर क्रोएशियात सुरू आहे. आता त्यापाठोपाठ भारतीय बॉक्सिंग संघही परदेशात तीन आठवडे सराव करून जपानला जाणार आहे. बॉक्सिंग स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक आठवडा भारतीय संघ जपानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

बॉक्सिंग संघाच्या परदेशातील सरावाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांतच ठिकाणही निश्चित होईल. तीन आठवडे परदेशात सराव केल्यानंतर संघ मायदेशी येईल. त्यानंतर स्पर्धेपूर्वी एक आठवडा अगोदर टोकियोत दाखल होईल, असे भारतीय बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सँतिएगो निएवा यांनी सांगितले.

कोरोना महामारी असताना भारतीय बॉक्सिंग संघाने युरोपात सराव केला होता; मात्र त्यानंतरच्या मायदेशातील शिबिरात व्यत्यय आला. पुरुष संघाचे मार्गदर्शक सी. ए. कुटप्पा यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. महिला संघ मार्गदर्शक मोहम्मद अली कमार यांच्या सहकाऱ्यांना कोरोना झाल्याने त्यांना विलगीकरणात राहावे लागले होते.

निएवा म्हणाले
आशियाई स्पर्धेतील एकंदरीत कामगिरी समाधानकारक
ऑलिंपिक स्पर्धा लक्षात घेतल्यास प्रत्येक खेळाडूत माफक उणिवा आहेत, पण त्या शिबिरात दूर होऊ शकतील
प्रतिस्पर्धी नजीक येतात त्या वेळी भारतीय काहीसेच कमी पडत आहेत
संजीतने यात चांगली प्रगती केली आहे, त्याच्या अंतिम सामन्यातून हे निश्चितच लक्षात येते.


​ ​

संबंधित बातम्या