ऑलिम्पिक खेळाडूंना कोरोना लस प्रथम द्या ; भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनची सरकारकडे मागणी

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

कोरोनाची लस तयार झाली तर ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या खेळाडूंना द्या, अशी मागणी भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनने (एएफआय) केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची लस तयार झाली तर ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या खेळाडूंना द्या, अशी मागणी भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनने (एएफआय) केली आहे. भारतासह काही देश कोरोनावर लसीचे संशोधन करत आहेत. ही लस तयार झाली तर प्रथम कोरोना योद्धा आणि सैनिकांना प्राधान्याने देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. 

पीएसजीचा स्ट्रायकर खेळाडू नेमारवर बंदीची टांगती तलवार  

एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना प्रथम लस द्यावी, अशी मागणी केली आहे. आदिल सुमारीवाला यांनी ॲथलेटिक्‍सच्या वेबिनार सरम्यान ही माहिती दिली. सुमारीवाला यांनी या वेबिनार मध्ये बोलताना, ''आम्ही आधीच सरकारशी याविषयी चर्चा करीत आहोत आणि त्यांना सांगितले आहे की ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंना ही लस आवश्यक आहे. याशिवाय लस आल्यानंतर खात्री करुन घेण्याची गरज आहे की ते घेणाऱ्यांमध्ये ऑलिम्पिकमध्ये जाणारे खेळाडू देखील सुरुवातीच्या काळात सहभागी असतील आणि यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे."      

अव्वल खेळाडूंसाठी लीग सारख्या स्पर्धा सुरू कराव्यात - पुलेला गोपीचंद

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची टोकियो मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. 2021 साली 23 जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. तर 8 ऑगस्ट 1021 ला या ऑलिम्पिकची सांगता होणार असून, 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पॅरालम्पिक खेळवण्यात येणार आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या