ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करेल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात काही दिवसांवर आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास भारतीय ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

टोकियो - टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात काही दिवसांवर आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास भारतीय ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. वैयक्तिक स्पर्धेतील संभाव्य पदकविजेत्यांची यादी असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केली आहे. त्यानुसार भारतीय संघ ५ सुवर्ण, पाच रौप्य तसेच ११ ब्राँझ अशी एकूण २१ पदकांची कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या अपेक्षित पदकविजेत्यांच्या यादीत नेमबाजीत भारतास सर्वाधिक पदके देण्यात आली आहेत. हा अंदाज खरा मानल्यास ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ ब्राँझ जिंकतील; तर दीपिका कुमारी भारतास तिरंदाजीत दोन रौप्यपदके जिंकून देईल. बॉक्सिंगमध्ये केवळ लोवलिना बोर्गोहेन पदक जिंकेल असा कयास आहे.

या अंदाजात भारतास सर्वाधिक धक्का बॅडमिंटनमध्ये आहे. त्यानुसार सिंधू टोकियोत पदक न जिंकताच परत येईल. या अंदाजानुसार चीनची चेन युफेई ही सुवर्ण, तई झु यिंग रौप्य आणि अकेन यामागुची ब्राँझ पदक जिंकणार आहे. नीरज चोप्राकडून भालाफेकीत अपेक्षा आहे, पण तो संभाव्य पदकविजेत्यांत नाही.

नेमबाजी ५ सुवर्ण ३ रौप्य ५ ब्राँझ
सुवर्ण- दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी (सौरभ चौधरी आणि मनू भाकर). २५ मीटर पिस्तूल महिला (चिंकी यादव), दहा मीटर एअर पिस्तूल पुरुष (अभिषेक वर्मा) तसेच महिला (यशस्विनी देसवाल), दहा मीटर एअर रायफल पुरुष (दिव्यांश सिंग पवार),
रौप्य- दहा मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी (दिव्यांश सिंग पंवार आणि एलावेनिल वलारिवान), दहा मीटर एअर पिस्तूल महिला (मनू भाकर), दहा मीटर एअर रायफल महिला (एलावेनिल वलारिवान)
ब्राँझ- दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी (अभिशेक वर्मा, यशस्वीनी देस्वाल), २५ मीटर पिस्तूल (राही सरनोबत) दहा मीटर एअर पिस्तूल पुरुष (सौरभ चौधरी), दहा मीटर एअर रायफल महिला (अंजुम मौदगिल), ५० मीटर रायफल थ्री पोझीशन पुरुष (ऐश्वर्य तोमर)

वेटलिफ्टिंग - १ ब्राँझ
महिलांच्या ४९ किलो गटात ब्राँझ (साईखोम मीराबाई चानू)

कुस्ती ४ ब्राँझ
पुरुष- ५७ किलो गटात ब्राँझ (रवी कुमार), ६५ किलो गटात ब्राँझ (बजरंग पुनिया), ८६ किलो गटात ब्राँझ (दीपक पुनिया)
महिला- ५३ किलो गटात ब्राँझ (विनेश फोगट),

तिरंदाजीः दोन रौप्य
मिश्र दुहेरी (दीपिका कुमारी व अतानू दास) रौप्य तसेच महिलांच्या स्पर्धेत वैयक्तिक (दीपिका कुमारी) रौप्य

बॉक्सिंगः एक ब्राँझ
महिला- लोवलिना बोर्गोहेन (वेल्टरवेट)


​ ​

संबंधित बातम्या