2032 च्या ऑलिंपिकसाठी भारत अजूनही प्रयत्नशील 

संजय घारपुरे
Tuesday, 15 December 2020

भारत अजूनही 2032 च्या ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिकच्या आयोजनासाठी उत्सुक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात होईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : भारत अजूनही 2032 च्या ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिकच्या आयोजनासाठी उत्सुक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात होईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी सांगितले. 

ऑलिपिक रद्द करण्याचा प्रश्‍नच नाही; टोकियो राज्यपालांची स्पष्टोक्ती

ऑलिंपिक संयोजनाच्या शर्यतीत उतरण्यास भारत उत्सुक आहे, पण कोरोना आक्रमणामुळे ही योजना स्थगित आहे. या स्पर्धेसाठी यापूर्वी क्वीन्सलॅंड (ऑस्ट्रेलिया), जाकार्ता (इंडोनेशिया), दोहा (कतार), चेंगदू - चॉंगक्विंग (चीन) आणि जर्मनी उत्सुक आहेत. सयुक्त कोरियाने माघार घेतली आहे. भारत नक्कीच उत्सुक आहे, त्याबाबत नव्या वर्षात चर्चा होईल असे बत्रा यांनी सांगितले. 

कोरोनाची लाट पुन्हा उसळतीये; प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये नो एन्ट्री!

बत्रा यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष झाल्यावर 2032 चे ऑलिंपिक, 2030 ची आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2026 चे युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. 2030 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजनातून भारत यापूर्वीच बाहेर गेला आहे. दोहा आणि रियाधमध्ये आता स्पर्धा आहे. 2022 चे युवा ऑलिंपिक चार वर्षांनी पुढे ढकलताना त्याचे यजमानपद कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र भारत 2030 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या