ऑस्ट्रेलियाकडून भारताचा हॉकीत धुव्वा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

न्यूझीलंडचे कडवे आव्हान परतविलेला भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या झंझावातासमोर टिकाव धरू शकला नाही, त्यामुळे भारतीय हॉकी संघास ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत १-७ अशा एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागले.

टोकियो - न्यूझीलंडचे कडवे आव्हान परतविलेला भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या झंझावातासमोर टिकाव धरू शकला नाही, त्यामुळे भारतीय हॉकी संघास ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत १-७ अशा एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागले. 

भारताने न्यूझीलंडचे आव्हान परतवले होते, तर ऑस्ट्रेलियाचा कस दुबळ्या जपानने पाहिला होता, त्यामुळे भारत - ऑस्ट्रेलिया लढत चुरशीची होईल ही अपेक्षा होती; पण ती पुरती फोल ठरली. मात्र कांगारूंनी त्यांच्या खास आक्रमक शैलीत खेळ करताना भारतास सुरुवातीस प्रतिकाराचीही संधी दिली नाही. 

भारतीय प्रसंगी गोलक्षेत्रात प्रवेश करीत होते. पेनल्टी कॉर्नर मिळवित होते; पण त्याचा काहीही फायदा होत नव्हता. दुसऱ्या सत्रात तीन गोल करीत ऑस्ट्रेलियाने विश्रांतीस ४-० आघाडी घेतली. 

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीस दीलप्रीत सिंगने गोल करीत भारताच्या आक्रमणात जान ओतली; पण ऑस्ट्रेलियाने त्यानंतर तीन गोल करीत निकाल स्पष्ट केला. विजेत्यांच्या सहा जणांनी गोल करीत आपली गोल करण्याची क्षमता प्रतिस्पर्ध्यांना दाखवून दिली. 

सामन्यातील कांगारूंची हुकूमत पाहता त्यांनी सातच गोल कसे केले, असा प्रश्न पडत होता. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि योजनाबद्ध चालींसमोर भारतीय बचाव पार कोलमडला.


​ ​

संबंधित बातम्या