वैयक्तिक मार्गदर्शक नसतील तर राष्ट्रीय मार्गदर्शकही नकोत; मनिका बत्रा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

वैयक्तिक मार्गदर्शक नसतील तर राष्ट्रीय मार्गदर्शकही नकोत, अशी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनिका बत्राने ऑलिंपिक क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी जी साथियनला दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली.

टोकियो / मुंबई - वैयक्तिक मार्गदर्शक नसतील तर राष्ट्रीय मार्गदर्शकही नकोत, अशी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनिका बत्राने ऑलिंपिक क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी जी साथियनला दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली.

वैयक्तिक मार्गदर्शक सन्मय परांजपे यांना स्पर्धा ठिकाणी प्रवेश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर  शनिवारी मनिकाने राष्ट्रीय मार्गदर्शक सौम्यदीप रॉय माझ्या लढतीच्यावेळी मार्गदर्शक नकोत, अशी ठाम भूमिका घेतली आणि त्यावरून वाद सुरू झाला. मात्र या वादंगातून जणू आपली भूमिका योग्य आहे, या जिद्दीने मनिकाने खेळ केला आणि तिच्यापेक्षा जागतिक क्रमवारीत ४३ स्थानांनी सरस असलेल्या युक्रेनच्या मार्गार्यता पेसतत्सका हिला पराजित केले. ही लढत मनिकाने पहिले दोन गेम गमाविल्यावर जिंकली हे विशेष. तिने या सामन्यात ४-३ (४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७) असा विजय मिळविला.

प्रतिस्पर्धीच्या सर्व्हिसवर पहिल्या दोन गेममध्ये केवळ दोन गुण जिंकू शकलेल्या मनिकाने त्यानंतर २६ गुण जिंकले, तर त्याचवेळी स्वतःच्या सर्व्हिसवर २७ गुणांची कमाई केली. तिने तिसऱ्या तसेच सहाव्या गेममध्ये तीन गुणांची पिछाडी भरून काढली.


​ ​

संबंधित बातम्या