आई लहानपणी खेळण्यातील बंदूक द्यायची; DSP होऊन हिमानं ते स्वप्न सत्यात उतरवलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 26 February 2021

लहान असल्यापासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून होते. ते स्वप्न आज सत्यात उतरले. शाळेत असल्यापासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहायचे.

भारताचा स्टार धावपटू हिमा दास हिची शुक्रवारी आसाम पोलिस अधीक्षकपदी (DSP) रुजू झाली. मैदानातील सुसाट कामगिरीनं देशाची अभिमान उंचावणाऱ्या हिमाच्या आयुष्यातील हा मोठ्या अभिमानाचा क्षण होता. एक शेतकऱ्याच्या मुलीनं घातलेल्या खाकी वर्दीवर जेव्हा स्टार लावण्याचा समारंभ झाला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जाणारे होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत हिमाचा पोलिसांतील उच्च पदावर नियुक्त करण्याचा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला आसाम पोलिसातील अनेक अधिकारी देखील उपस्थितीत होते. 

Image

यावेळी हिमा म्हणाली, लहान असल्यापासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून होते. ते स्वप्न आज सत्यात उतरले. शाळेत असल्यापासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहायचे. माझ्या आईलाही मला या वेषात पाहायचे होते. माझी आई दुर्गा उत्साहावेळी मला खेळण्यातील बंदूक द्यायची. आसाम पोलिसांत दाखल होऊन एक चांगली व्यक्ती बनून मी सेवा द्यावी, असे आईचे स्वप्न होते, असेही हिमाने कार्यक्रमात सांगितले.

 .  Image

आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती आणि जागतिक ज्यूनियर चॅम्पियनशिपची विजेती पोलिस सेवेसह आपले करियर सुरुच ठेवणार आहे. मला आज जे काही मिळाले आहे ते खेळामुळेच शक्य झाले. मी खेळावरील फोकस इथून पुढेही कायम ठेवेन, याशिवाय राज्यातील खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न करेन, असे हिमा म्हणाली. आसामला हरियाणाप्रमाणे खेळाची पंढरी बनवण्याचे स्वप्न उरी बाळगून या क्षेत्रासाठी काम करेन, असे आश्वासनही तिने दिले. 

 


​ ​

संबंधित बातम्या