Formula 1 season :आघाडी देण्यात आलेल्या लुईस हॅमिल्टनची सरशी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 March 2021

मोसमातील आगामी शर्यतीत हॅमिल्टन आणि वेर्त्सापन यांच्यात चुरस असणार हेच या शर्यतीत दिसले. त्यात हॅमिल्टनला 2015 नंतर प्रथमच मोसमातील पहिली शर्यत जिंकल्याचे समाधान लाभले.

बहारीन : अखेरच्या काही फेऱ्या शिल्लक असताना आघाडी बहाल करण्यात आलेल्या लुईस हॅमिल्टनने बहारीन ग्राप्रि जिंकून फॉर्म्युला वन मोसमास विजयी सुरुवात केली.  चार फेऱ्या असताना मॅक्‍स वेर्त्सापन याने आघाडी घेतली होती, पण ही आघाडी घेताना त्याने ट्रॅक सोडला होता, त्यामुळे हॅमिल्टनला पुन्हा आघाडी द्यावी अशी सूचना वेर्त्सापन याला संघाने केली. त्याचवेळी यास पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रेड बुल संघातून खेळणाऱ्या वेर्त्सापन याने अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नही केला नाही. 

मोसमातील आगामी शर्यतीत हॅमिल्टन आणि वेर्त्सापन यांच्यात चुरस असणार हेच या शर्यतीत दिसले. त्यात हॅमिल्टनला 2015 नंतर प्रथमच मोसमातील पहिली शर्यत जिंकल्याचे समाधान लाभले. पात्रतेत अव्वल असल्याचा फायदा घेत वेर्त्सापनने सुरुवातीस आघाडी घेतली.

ISSF World Cup : भारतीय नेमबाजांचा ‘षटकार’

पण मर्सिडिसने हॅमिल्टनला लवकर ब्रेक घेण्यास भाग पाडत आघाडी मिळवून दिली. हॅमिल्टनच्या ब्रेकनंतरही वेर्त्सापनला अकरा फेऱ्या रेसिंग करण्यास रेड बुलने भाग पाडले. मात्र वेर्त्सापनचे टायर अंतिम टप्प्याच्यावेळी जास्त नवे असणार याचे दडपण हॅमिल्टनवर होते. वेर्त्सापनने नेमका याचा फायदा घेण्यासाठी एका वळणावर हॅमिल्टनला मागे टाकले, पण त्याच्याकडून ट्रॅक सुटला. 
 


​ ​

संबंधित बातम्या