फ्लायड मेवेदर व लैला अली यांचा बॉक्सिंगच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

अनेक जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणारे फ्लायड मेवेदर, माजी हेवीवेट चॅम्पियन व्लादिमीर क्लीत्सको आणि लैला अली यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग 'हॉल ऑफ फेम अँड म्युझियम'मध्ये निवड झाली आहे.

अनेक जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणारे फ्लायड मेवेदर, माजी हेवीवेट चॅम्पियन व्लादिमीर क्लीत्सको आणि लैला अली यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग 'हॉल ऑफ फेम अँड म्युझियम'मध्ये निवड झाली आहे. मंगळवारी 2021 मधील 'हॉल ऑफ फेम अँड म्युझियम' श्रेणीत समावेश करण्यात आलेल्या खेळाडूंची नवे जाहीर करण्यात आली. माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आंद्रे वार्ड, एन वोल्फे, मारियन ट्रिमियर आणि मार्गेट गुडमॅन यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. 

2032 च्या ऑलिंपिकसाठी भारत अजूनही प्रयत्नशील 

वेगवेगळ्या प्रकारात मरणोपरांत निवडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये लाईटवेट चॅम्पियन डेव्ही मूर, जॅकी टोनवंडा, कट मॅन फ्रेडी ब्राउन, मॅनेजर व ट्रेनर राहिलेले जॅकी मॅकॉय पत्रकार जॉर्ज किंबल आणि टीव्ही कार्यकारी जे लार्किन यांचा समावेश आहे. या सर्वांचा 13 जून रोजी समावेश करण्यात येणार आहे. तसेच यावेळेस मागील वर्षातील श्रेणीचा देखील समावेश करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी याचे नियोजन रद्द करण्यात आले होते.   

 


​ ​

संबंधित बातम्या