ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गौरव अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

दुबईत सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सैनीने (७० किलो) अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले तर इतर तिघांनी उपांत्य फेरी गाठली. गौरव सैनीने किर्गिस्तानच्या झाकिरोवचा ४-१ असा पराभव केला. मुले आणि मुली यांच्या युवा आणि ज्युनियर अशा दोन विभागात ही स्पर्धा प्रथमच होत आहे.

नवी दिल्ली - दुबईत सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सैनीने (७० किलो) अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले तर इतर तिघांनी उपांत्य फेरी गाठली. गौरव सैनीने किर्गिस्तानच्या झाकिरोवचा ४-१ असा पराभव केला. मुले आणि मुली यांच्या युवा आणि ज्युनियर अशा दोन विभागात ही स्पर्धा प्रथमच होत आहे.

भारताच्या आशिष (५४ किलो), अंशूल (५७) आणि भारत जोन (८१ पेक्षा अधिक) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. आशिषने तझाकिस्तानच्या रहमानोव जाफरचा ५-० असा धुव्वा उडवला तर अंशूलने अमिरातीच्या रहामानोव कमालीचे वर्चस्व राखले. रेफ्रींनी ही लढत पहिल्या राऊंडमध्येच थांबवली. जोनला मात्र उपांत्यपूर्व फेरीतील विजयासाठी कठोर प्रयत्न करावे लागले. उझबेकिस्तानच्या केनेस्बेव अर्यानाझरवर त्याने ३-२ अशी मात केली. क्रिश पाल (४६) आणि प्रीत मलिक (६३) यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पालची उझबेकिस्तानच्या बख्तियार याखशलिबोवविरुद्धची लढत दुसऱ्या राऊंडनंतर रेफ्रींनी थांबवली.  तर मलिक किर्गिस्तानच्या एल्दर इसेम्बेवविरुद्ध २-३ असे पराभूत झाला.


​ ​

संबंधित बातम्या