ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील प्रेक्षकांबाबत आज अंतिम निर्णय अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत उद्या (ता. २१) निर्णय होईल. दरम्यान, या निर्णयास काही तास असताना जपानने कोरोनाची साथ रोखण्याची राजधानी टोकियोतील ऑलिंपिक फॅन झोन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत उद्या (ता. २१) निर्णय होईल. दरम्यान, या निर्णयास काही तास असताना जपानने कोरोनाची साथ रोखण्याची राजधानी टोकियोतील ऑलिंपिक फॅन झोन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलिंपिक स्पर्धा संयोजकांवर प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्यासाठी दडपण येत आहे. ऑलिंपिक संयोजनानंतरही कोरोनाची साथ नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेक्षकांविना स्पर्धा हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे जपान सरकारच्या महामारी प्रतिबंधक समितीतील तज्ज्ञ शिगेरु ऑमी यांनी सांगितले.

परदेशी प्रेक्षकांना यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे. स्पर्धा पाच आठवड्यांवर असताना जपानचे पंतप्रधान सैको हाशिमोतो प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतील. स्पर्धेची तिकिटे अनेकांनी खरेदी केली आहेत. त्यामुळे आम्हाला प्रेक्षकांच्याबाबत निर्णय लवकरात लवकर घेणे भाग आहे, असे हाशिमोतो यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या