गिडी, चेप्तेगेईच्या जागतिक विक्रमास तंत्रज्ञानाचे साह्य? 

संजय घारपुरे
Thursday, 8 October 2020

जागतिक ऍथलेटिक्‍समध्ये काही मिनिटांच्या अंतराने दोन जागतिक विक्रमांची नोंद झाली, पण आता या विक्रमांबरोबरच विक्रमवीरांनी परिधान केलेल्या शूजची तसेच त्यांच्या स्पाईक्‍सची चर्चा जास्त होईल. 

व्हॅलेन्सिया (स्पेन) : जागतिक ऍथलेटिक्‍समध्ये काही मिनिटांच्या अंतराने दोन जागतिक विक्रमांची नोंद झाली, पण आता या विक्रमांबरोबरच विक्रमवीरांनी परिधान केलेल्या शूजची तसेच त्यांच्या स्पाईक्‍सची चर्चा जास्त होईल. 

व्हॅलेन्सियात घेतलेल्या जागतिक विक्रमी दिनी इथिओपियाच्या लेतेसेनबेत गिडी हिने पाच हजार मीटरमध्ये 14 मिनिटे 6.62 सेकंदाचा जागतिक विक्रम करताना तिरुनेश दिबाबा हिचा विक्रम चार सेकंदाने मागे टाकला. त्यानंतर काही वेळातच जोशुआ चेप्तेगेई याने 10 हजार मीटरमध्ये जागतिक विक्रम केला. त्याने 26 मिनिटे 11 सेकंदाचा विक्रम करताना केनेनिसा बेकेले याचा विक्रम सहा सेकंदांनी सुधारला. पुरुषांच्या पाच हजार मीटरमधील विक्रमही चेप्तेगेईचाच आहे. 

क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

गिडी तसेच चेप्तेगेई यांनी नायके झूमएक्‍स ड्रॅगनफ्लाय स्पाईक्‍स परिधान केले होते. त्यात कार्बन प्लेट आणि युनिक फोम आहे. त्याचे वर्णन सर्वांत वेगवान शूज असेच केले जात आहे. बहुतेक ऍथलीटस्‌ हे शूज आपल्याला योग्य वाटत नसल्याचे सांगतात, पण त्यास जागतिक महासंघाने मंजुरी दिली आहे. अर्थात, त्याचबरोबर दोघाही विक्रमवीरांना वेव्हलाईट तंत्रज्ञानाचाही फायदा झाला. त्याद्वारे धावकास विक्रम मोडण्यासाठी किती गती हवी हे दाखवले जाते. गेल्याच महिन्यात मो फराह आणि हसन सिफान यांनी हेच शूज आणि वेव्हलाईट तंत्रज्ञानाचा वापर करीत विक्रम केला होता. 

धोनीनंतर आता मुथय्या मुरलीधरनचा येणार बायोपिक ; साऊथचा अभिनेता साकारणार भूमिका 

जागतिक विक्रम होत असताना मैदानावर केवळ 400 जणांना प्रवेश होता. हा कार्यक्रमही चेप्तेगेईच्या एनएन रनिंग टीमने घेतला होता. या वेळी कोणतीही शर्यत नव्हती, पण जागतिक विक्रमाचा प्रयत्न करणाऱ्या धावकांसाठी पेसरची मदत होती. गिडीने पाच हजार मीटरमध्ये विक्रम करताना 1952 च्या ऑलिंपिकमधील पुरुष विजेत्याची वेळ नोंदवली. जागतिक विक्रमाचे सहा वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकारले असे तिने सांगितले.

 


​ ​

संबंधित बातम्या