द्युती चंद, अन्नूला ऑलिंपिकचे तिकीट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

अ पात्रता निकष नोंदवून ऑलिंपिकला प्रवेश मिळवण्याची मुदत १ जुलैला संपणार आहे. मात्र जागतिक क्रमवारीत आघाडीचे स्थान असल्यामुळे द्युती चंद, अन्नू राणी तसेच एमपी जबीर या अॅथलीट््सना ऑलिंपिकचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - अ पात्रता निकष नोंदवून ऑलिंपिकला प्रवेश मिळवण्याची मुदत १ जुलैला संपणार आहे. मात्र जागतिक क्रमवारीत आघाडीचे स्थान असल्यामुळे द्युती चंद, अन्नू राणी तसेच एमपी जबीर या अॅथलीट््सना ऑलिंपिकचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. 

आंतर राज्य स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत ११.१७ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम केल्यानंरही द्युती ११.१५ सेकंदाची पात्रता गाठू शकली नाही. मात्र ऑलिंपिक पात्रता साध्य केलेले अॅथलीट््स सोडल्यास महिलांच्या १०० मीटर शर्यतीत २२ आणि २०० मीटर शर्यतीत १५ स्पर्धकांची जागतिक क्रमवारीनुसार निवड होईल. त्याचा द्युतीला फायदा होऊ शकेल.

अन्नू राणीने भालाफेकीत ६२.८३ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते, पण ती ६४ मीटरची पात्रता गाठू शकली नाही. मात्र तिने आशियाई स्पर्धेत रौप्य तर आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझ जिंकले होते.


​ ​

संबंधित बातम्या