आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती अध्यक्षांच्या स्वागताच्या वेळी निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांचे संयोजन समितीच्या वतीने रविवारी अधिकृत स्वागत करण्यात आले. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासह खास ४० व्हीआयपींच्या उपस्थितीत हे स्वागत झाले; पण हा सोहळा सुरू असताना ऑलिंपिक स्पर्धांविरोधात निदर्शने करण्यात आली.

टोकियो - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांचे संयोजन समितीच्या वतीने रविवारी अधिकृत स्वागत करण्यात आले. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासह खास ४० व्हीआयपींच्या उपस्थितीत हे स्वागत झाले; पण हा सोहळा सुरू असताना ऑलिंपिक स्पर्धांविरोधात निदर्शने करण्यात आली.

कोरोना महामारी असल्यामुळे संयोजकांनी या कार्यक्रमातील अनेक गोष्टी रद्द केल्या होत्या. कोणत्याही प्रकारचे माफक स्नॅक्सही देण्यात आले नाहीत. टोकियोत आणीबाणी जाहीर करीत आम्ही ही स्पर्धा जाहीर केल्यानुसार घेत आहोत, याकडे संयोजन समितीप्रमुख सेईको हाशीमोतो यांनी लक्ष वेधले. 

सोहळा असलेल्या सभागृहाबाहेर स्पर्धा विरोध तीव्र होता. कोणतीही आवश्यकता नसलेला हा सोहळा तातडीने रद्द करा. आम्ही कोणाचेही स्वागत करणार नाही. बाक परत जा, अशा घोषणा देण्यात आल्या. या स्पर्धेसाठी आलेल्या पाहुण्यांना परत पाठवा, अशी मागणी झाली. कोरोना असो वा नसो, ऑलिंपिक स्पर्धा घेऊन केईगो ओयामादा यांना संरक्षण दिले जात आहे. त्यांच्याकडेच उद््घाटन सोहळ्याची जबाबदारी सोपविण्याची काय गरज होती, अशी विचारणा करण्यात आली. 

ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करणार; पण त्यास कोणास प्रवेशही नसणार, मग या सोहळ्याने साधणार काय? 
- जपानमधील सर्वसामान्यांची भावना


​ ​

संबंधित बातम्या