राष्ट्रीय शिबिरासाठी दाखल झालेल्या कुस्तीपटू दीपक पुनियासह तिघांना कोरोना

सुशांत जाधव
Thursday, 3 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रिय शिबिरात सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंना कोरोनाच्या चाचणीतून जावे लागते. या नियमावलीनुसार, खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. यात हे तीन मल्ल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

भारतीय कुस्ती महासंघाच्या पुरुष कुस्तीपटूंच्या सोनीपत येथील राष्ट्रीय शिबिरासाठी दाखल झालेल्या कुस्तीपटूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चंदेरी कामगिरी करणाऱ्या दिपक पुनिया (85 किलो वजनी गट) नवीन  (65 किलो वजनी गट) आणि क्रिशन  (120 किलो वजनी गट) या तीन कुस्तीपटूंचा समावेश आहे. साई (Sports Athority Of India ) ने या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

चाहत्याला CSK चा प्रतिप्रश्न; हुशार कॅप्टन असताना उप-कॅप्टनची चिंता कशाला?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रिय शिबिरात सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंना कोरोनाच्या चाचणीतून जावे लागते. या नियमावलीनुसार, खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. यात हे तीन मल्ल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती साईने एका निवदेनाच्या माध्यमातून दिली आहे. 2019 मध्ये दीपक पुनियाने लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कनिष्ठ गटात (ज्यूनियर) सुवर्ण पदक पटकावले होते. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा भारताचा तो पहिला कुस्तीपटू ठरला होता. 

रैना-चेन्नई फ्रॅंचाईस यांच्यात समेट?

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत खेळण्याची शक्‍यता असलेल्या कुस्तीगीरांच्या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील अव्वल कुस्तीगीरांनीही या शिबिराच्या आयोजनास मंजुरी दिली होती.  महिला कुस्तीगीराचे शिबिर लखनौला तर पुरुष कुस्तीगीरांचे शिबिर सोनीपतला होणार आहे. राष्ट्रीय कुस्तीगीरांचे शिबिर मार्चपासून स्थगित आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शिबिर सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला, पण अव्वल कुस्तीगीरांनी त्यास नकार दिल्यामुळे मुहूर्त रखडला होता. या शिबिराच्या सुरुवातीलाच कुस्तीपटू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.  


​ ​

संबंधित बातम्या