सुशीलची संपत्ती जप्त करण्याचा विचार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

कुस्तीगीर सागरच्या हत्या प्रकरणात आरोप असलेल्या सुशील कुमारविरुद्धची मोहीम दिल्ली पोलिसांनी तीव्र केल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढले असून त्याची संपत्ती जप्त करण्याबाबतही विचार सुरू आहे.

नवी दिल्ली - कुस्तीगीर सागरच्या हत्या प्रकरणात आरोप असलेल्या सुशील कुमारविरुद्धची मोहीम दिल्ली पोलिसांनी तीव्र केल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढले असून त्याची संपत्ती जप्त करण्याबाबतही विचार सुरू आहे. 

सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छत्रसाल स्टेडियममध्ये काही कुस्तीगिरांना मालमत्तेच्या वादंगातून मारहाण केली होती. या घटनेनंतर काही तासांनी सुशील फरारी झाला आहे. त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. 

काही वर्षांपूर्वी छत्रसालची धुरा सांभाळण्यासाठी सुशीलने रेल्वेतील नोकरी सोडली होती आणि त्यानंतर त्याला दिल्लीच्या शिक्षण विभागात नोकरी देण्यात आली. सुशीलची कोंडी करण्यासाठी दिल्ली सरकारने त्याच्या नोकरीबाबत कठोर निर्णय घ्यावा, अशी शिफारस दिल्ली पोलिसांनी केली असल्याची चर्चा आहे.


​ ​

संबंधित बातम्या