भारतीय ॲथलीटस््साठी ग्रांप्रि स्पर्धेचेही संयोजन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

अधिकाधिक भारतीय ॲथलीटस््नी ऑलिंपिक पात्रता निकष साध्य करावेत, यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने आंतरराज्य स्पर्धेपूर्वी चौथ्या ग्रांप्रि भारतीय स्पर्धा शर्यतीचे संयोजन केले आहे.

मुंबई - अधिकाधिक भारतीय ॲथलीटस््नी ऑलिंपिक पात्रता निकष साध्य करावेत, यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने आंतरराज्य स्पर्धेपूर्वी चौथ्या ग्रांप्रि भारतीय स्पर्धा शर्यतीचे संयोजन केले आहे. कझाकस्तान तसेच किर्गिस्तानमधील स्पर्धा सहभाग अशक्य झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात लसीकरण झाले असले, तरी त्यांच्यासाठी चौदा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे असेल, असा निर्णय किर्गिस्तान तसेच कझाकस्तानने घेतला आहे. त्यामुळे कझाकस्तानला १२ आणि १३ जूनला तसेच किर्गिस्तानला १९ आणि २० जूनला होणाऱ्या स्पर्धेतून भारताने माघार घेतली आहे. २१ जूनला भारतीय ग्रांप्रि तसेच २५ ते २९ जून दरम्यान आंतरराज्य स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या