आशियाई टे.टे.पेक्षा चीनचे राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

चीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चीनच्या टेबल टेनिस संघटनेकडून देण्यात आली आहे.

बीजिंग - चीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चीनच्या टेबल टेनिस संघटनेकडून देण्यात आली आहे.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान कतारची राजधानी दोहा येथे नियोजित आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेवरून परतल्यानंतर खेळाडू आपापल्या स्थानिक संघांत सहभागी झाले असून त्यांनी चीनमधील ‘मिनी-ऑलिंपिक’ समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

आगामी काळात होस्टन येथील जागतिक अजिंक्यपद व चीनमधील टेबल टेनिस सुपर लीग या स्पर्धा चीनचे लक्ष्य असणार आहेत. ‘देशातील राष्ट्रीय स्पर्धा या १७ ते २६ सप्टेंबरदरम्यान नियोजित आहेत, त्यांनतर अगदी थोड्या कालावधीत कतार येथे आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाण करून आशियाई स्पर्धेच्या नियोजित वेळेत पोहचणे कठीण आहे,’ अशी माहिती चीन टेबल टेनिस संघटनेचे संचालक किन झिझियान यांनी या वेळी दिली आहे.

कोरोना काळात खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक मर्यादा आहेत. जैवीकरणातील थांबे व विलगीकरणाचा संघाच्या आगामी दौऱ्यावर परिणाम होणार होता. आशियाई स्पर्धेतील सहभागाचा खेळाडूंच्या वैयक्तिक विकासासाठीदेखील फायदा होणार नसल्याने, पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- किन झिझियान, प्रशिक्षक, पुरुष टेबल टेनिस संघ


​ ​

संबंधित बातम्या