तीन वर्षांनी येणाऱ्या ऑलिंपिकसाठी तयारीचे आव्हान - बिंद्रा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

एरवी दर चार वर्षांनी ऑलिंपिक होत असते. त्यामुळे इतर जागतिक स्पर्धा, पात्रता स्पर्धा आणि विश्रांती आणि ऑलिंपिक सहभाग असे व्यवस्थित चक्र असते, परंतु तीन वर्षांनी येणारी ऑलिंपिक सर्वांसाठी आव्हानात्मक असेल असे मत भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव ब्रिंदाने व्यक्त केले.

नवी दिल्ली - एरवी दर चार वर्षांनी ऑलिंपिक होत असते. त्यामुळे इतर जागतिक स्पर्धा, पात्रता स्पर्धा आणि विश्रांती आणि ऑलिंपिक सहभाग असे व्यवस्थित चक्र असते, परंतु तीन वर्षांनी येणारी ऑलिंपिक सर्वांसाठी आव्हानात्मक असेल असे मत भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव ब्रिंदाने व्यक्त केले.

२०२० मध्ये होणारी टोकियो ऑलिंपिक कोरोनामुळे एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली आणि ती २०२१ मध्ये झाली; मात्र पुढची ऑलिंपिक नियोजनाप्रमाणे २०२४ मध्ये पॅरिसला होणार होती. खेळाडूंना तीनच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. बिंद्राने हाच मुद्दा उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे सर्वच स्पर्धांचा कार्यक्रम बिघडला आहे. अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यात टोकियो ऑलिंपिक यशस्वीपणे पार पडली. पुढे ढकलण्यात आलेल्या काही स्पर्धा पुढच्या काही वर्षांत होतील त्याचबरोबर विश्व अजिंक्यपदांसारख्या इतरही स्पर्धा होत राहातील त्यात पात्रता स्पर्धांमध्येही सहभागी व्हावे लागेल. हे आव्हान स्वीकारताना खेळाडूंना विश्रांतीही आवश्यक असेल. त्यामुळे पुढच्या ऑलिंपिकपर्यंत खेळाडूंचा कार्यक्रम व्यस्त असेल असे बिंद्रा म्हणाला.

एका क्रीडाविषयक वेबिनारमध्ये बोलताना बिंद्राने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीयांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. प्रथमच भारताला सर्वाधित सात पदके मिळाली. आता चांगली लय मिळाली आहे त्याचा फायदा घेत येथून पुढे आणखी चांगली कामगिरी करत राहिले पाहिजे, असे बिंद्राने सांगितले. 

वैयक्तिक सुवर्णपदपकाच्या पंक्तीत बसलेल्या नीरज चोप्राचेही बिंद्राने कौतुक केले. आता येथून पुढे प्रगती करण्यासाठी ग्रासरूटपासून शास्त्रशुद्ध उच्च दर्जाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. आपण नेहमीच नेत्तृत्वाची चर्चा करतो, परंतु दुसऱ्या श्रेणीचे नेतृत्व तयार करणे तेवढेच महत्त्वाचे असते. अशा व्यक्तींना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपण अव्वल खेळाडू तयार करू शकतो, असे मत ब्रिंदाने व्यक्त केले.

उच्च श्रेणीचे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी विश्लेषण, औषधोपचार या सर्व एलिट खेळाडूंच्या गोष्टी आहेत, पण ही सुविधा आपण ग्रासरूटपासून द्यायला हवी, असे सांगून ब्रिंदा म्हणाला, आपल्याकडे कॉलेज स्तरावर चांगली क्रीडा संस्कृती तयारी झालेली नाही, त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. ज्युनियर ते सिनियर असा प्रवास होत असताना आपण अनेक गुणवत्ता ज्युनियर पातळीवरच गमावत असतो.


​ ​

संबंधित बातम्या