सिमोनला पुनरागमनात ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

अमेरिकेची सुपरस्टार जिम्नॅस्ट सिमोन बायल्स हिला मानसिक आजाराच्या समस्येमुळे सांघिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती; मात्र काही दिवसांतच तिने पुनरागमन करत महिलांच्या बॅलस्न बीम प्रकारात मंगळवारी ब्राँझपदक जिंकले.

टोकियो - अमेरिकेची सुपरस्टार जिम्नॅस्ट सिमोन बायल्स हिला मानसिक आजाराच्या समस्येमुळे सांघिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती; मात्र काही दिवसांतच तिने पुनरागमन करत महिलांच्या बॅलस्न बीम प्रकारात मंगळवारी ब्राँझपदक जिंकले.

टोकियोत बायल्स तीन वैयक्तिक गटात विजेतेपद राखण्यात अपयशी ठरली. रिओ द जानेरो ऑलिंपिक स्पर्धेत तिने चार सुवर्णपदके जिंकली होती. आठवडाभरापूर्वी तिने सांघिक स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर मंगळवारी ती प्रथमच स्पर्धेत सहभागी झाली. 

पुनरागमन करणाऱ्या बायल्सला संघ सहकाऱ्यांनी जोरदार प्रोत्साहन दिले. तिने तिसरा क्रमांक मिळवताना १४.००० गुण नोंदविले. चीनच्या गुआन चेनचेन हिने सुवर्णपदक जिंकताना १४.६३३ गुण, तर चीनचीच टँग शिजिंग हिने रौप्यपदक पटकावताना १४.२३३ गुण नोंदविले. बायल्स २४ वर्षांची आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकण्याच्या अपेक्षेने ती आली होती. मात्र तिने आठवड्यापूर्वी सांघिक स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर तिचे खेळाडूच्या मानसिक स्वास्थ्यावरील वक्तव्य आणि माघारीला भरपूर प्रसिद्धी लाभली होती.


​ ​

संबंधित बातम्या