कोरोना निर्बंध मोडल्यास ऑलिंपिक स्पर्धेतून होणार खेळाडूंची हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेदरम्यान कोरोनाची साथ पसरू नये यासाठी खेळाडूंसाठी कठोर निर्बंध ठरवण्यात आले आहेत. त्याचा भंग केल्यास स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात येईल, असा कठोर इशारा संयोजन समितीने दिला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या नियमावलीत यावर भर देण्यात आला आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेदरम्यान कोरोनाची साथ पसरू नये यासाठी खेळाडूंसाठी कठोर निर्बंध ठरवण्यात आले आहेत. त्याचा भंग केल्यास स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात येईल, असा कठोर इशारा संयोजन समितीने दिला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या नियमावलीत यावर भर देण्यात आला आहे.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी मार्गदर्शक असलेल्या प्लेबुकच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्यात कोरोनाच्या नियमावलीचे पालन न केल्यास त्यांची स्पर्धेसाठी असलेली अधिस्वीकृती रद्द करण्यात येईल, तसेच त्यांचा स्पर्धा सहभागाचा हक्कही रद्द होऊ शकेल. त्याशिवाय दंडही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने नियमावली जाहीर केली आहे. त्यात काही निर्बंध न पाळल्यास त्याबाबतचे अंतिम आधिकार जपान सरकारकडे असतील. त्यात जपानमधील मुक्कामाची मंजुरी रद्द करण्यापर्यंतची शिक्षाही असेल असे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात खेळाडूंनी स्वयंचाचणीचे नमुने कधी सादर करावेत याची नेमकी वेळही दिली आहे.

ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंची रोज चाचणी होणार आहे. त्यासाठी खेळाडूंनी सकाळी ९ अथवा संध्याकाळी ६ वाजता लायझन आधिकाऱ्यांकडे आपले नमुने देणे बंधनकारक आहे. त्यात बाधित आढळल्यास पॉलिमेरास चेन रिअॅक्शन चाचणी होईल. नाकातून स्वॅब घेऊन ही चाचणी होईल. संयोजन समिती सुरू करणार असलेल्या कोरोना नियंत्रण केंद्रावर चाचणीचा अहवाल वेळेत देण्याची जबाबदारी असेल.


​ ​

संबंधित बातम्या