आश्चर्यकारक विजयानंतर भारताची हरहुन्नरी बॉक्‍सर निखत झहीरनचा पराभव, पण..,

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 March 2021

निखतने  उपउपांत्यपूर्व सामन्यात 2019 च्या जागतिक विजेत्या पाल्तसेवा एकार्तेनियाला पराभवाचा धक्का दिला होता.

नवी दिल्ली : इस्तंबुल येथे सुरू असलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची हरहुन्नरी बॉक्‍सर निखत झहीरनला पराभवाचा धक्का बसला, दोन वेळा जागतिक अजिंक्‍यपद मिळवलेल्या कझाकिस्तानच्या नाझिम क्‍येझाबेचा पराभव करून निखतने 51 किलो गटाची उपांत्य फेरी गाठली होती. परंतु तिला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत झहीरनला 2019 च्या जागतिक स्पर्धेती रौप्यपदक विजेत्या तुर्कस्थानच्या बुसेनाझ कॅग्रिओग्लूविरुद्ध पराभव स्विकारावा लागला.  

निखतने शुक्रवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात 2019 च्या जागतिक विजेत्या पाल्तसेवा एकार्तेनियाला पराभवाचा धक्का दिला होता. या शानदार विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या निखतने आज नाझिम क्‍येझाबेविरुद्धही आपले वर्चस्व प्रस्तापित केले. सुरुवातीपासून पकड मिळवत तिने 4-1 अशा शानदार विजयाची मोहर उमटवली. नाझिम क्‍येझाबे 2014 आणि 2016 च्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत विजेती ठरली होती.

झरीनता अपवाद वगळता 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या गौरव सोलंकी (57 किलो), स्थानिक अयकोल मिझानचे कडवे आव्हान मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. सुरुवातीपासून दोघे मुष्टियोद्धे चांगलेच आक्रमक होते, परंतु उत्तरोत्तर गौरवने वर्चस्व मिळवले. या विजयामुळे त्याचे किमान ब्राँझपदक निश्‍चित झाले. महिला विभागात सोनिया लाथर (57 किलो). परवीन (60 किलो), ज्योती (69) यांचे आव्हान संपुष्टात आले. पदकाची आशा असलेल्या शिवा थापाचा (63 किलो) तुर्कस्थानच्या हाकेन डोगानकडून 1-4 असा पराभव झाला.  
 


​ ​

संबंधित बातम्या