रोईंगमध्येही अरुण लालसह अरविंद सिंगचे यश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 May 2021

अरुण लाल आणि अरविंद सिंग यांनी ऑलिंपिक रोईंग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. यामुळे सलग सहाव्या ऑलिंपिक रोईंग स्पर्धेसाठी भारतीयांनी पात्रता मिळवली आहे.

मुंबई - अरुण लाल आणि अरविंद सिंग यांनी ऑलिंपिक रोईंग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. यामुळे सलग सहाव्या ऑलिंपिक रोईंग स्पर्धेसाठी भारतीयांनी पात्रता मिळवली आहे. अरुण आणि अरविंदने लाईटवेट डबल स्कल प्रकारात ही कामगिरी केली. मात्र जाकर खानची पात्रता नशिबाची साथ नसल्यामुळे हुकली.

जपानमधील या स्पर्धेत भारतीय जोडीने ३६.९२ सेकंदात २००० मीटर अंतर पार केले. यजमान जपानच्या जोडीने ३४.७० सेकंदासह अव्वल क्रमांक मिळवला. भारतीय जोडीने सुरुवात चागली केली. त्यानंतर वेग कायम राखला. एवढेच नव्हे तर अखेरच्या पाचशे मीटरमध्ये वेग वाढवला. या टप्प्यातील भारतीयांची वेळ जपानच्या जोडीपेक्षाही सरस आहे, याकडे भारतीय संघाचे मार्गदर्शक इस्माईल बेग यांनी लक्ष वेधले.

जाकर खान हा दुर्दैवी ठरला. तो सिंगल स्कल्स प्रकारात चौथा आला. या प्रकारात आघाडीच्या पाच जणांना पात्रतेची संधी होती. मात्र जर शर्यतीत अव्वल नसेल, तर एका प्रकारात एका देशासच पात्रता मिळते. आता दुहेरीत सरस कामगिरी असल्याने भारताने त्यातील पात्रता कायम ठेवण्याचे ठरवले. 

अर्जुन आणि अरविंद हे नवोदित स्पर्धक आहेत. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकत चांगली चुणूक दाखवली होती. ऑलिंपिक स्पर्धेमुळे त्यांना चांगला अनुभव मिळेल. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धत ते कामगिरी उंचावू शकतील. 
- इस्माईल बेग, मार्गदर्शक.


​ ​

संबंधित बातम्या