विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी तिरंदाज संग्रामप्रीत सिंग बिस्ला कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला कम्पाऊंड प्रकारातील तिरंदाज संग्रामप्रीत सिंग बिस्ला यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघासह पॅरिसला न जाण्याचा निर्णय घेतला. भारताचा पुरुष रिकर्व्ह संघ तसेच कम्पाऊंड संघ मंगळवारी रात्री रवाना झाले.

मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला कम्पाऊंड प्रकारातील तिरंदाज संग्रामप्रीत सिंग बिस्ला यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघासह पॅरिसला न जाण्याचा निर्णय घेतला. भारताचा पुरुष रिकर्व्ह संघ तसेच कम्पाऊंड संघ मंगळवारी रात्री रवाना झाले.

संग्रामप्रीतने कोरोनाची तीनदा चाचणी केली होती. त्यातील एक खासगी प्रयोगशाळेत केली होती. याच चाचणीत तो पॉझिटिव्ह आला. सरकारी प्रयोगशाळेतील चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवून मी स्पर्धेसाठी सहज रवाना होऊ शकलो असतो, पण माझ्यामुळे संघाचा सहभाग संकटात येण्याची शक्यता होती. त्यामुळे मी स्पर्धेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला असे त्याने सांगितले.

बिस्लामुळे भारतीय संघातील अन्य सदस्यांना बाधा होण्याची शक्यता नव्हती. संघातील सर्वच सदस्यांनी स्वतंत्रपणे सराव केला होता. संग्रामप्रीतला मार्गदर्शन करणारे गौरवही त्याच्या संपर्कात नव्हते, त्यामुळे तेही रवाना झाले आहेत, असे भारतीय संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या