अमेरिकी जिम्नॅस्टला रशियाकडून हादरा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

सिमॉन बाईल्सने अचानक माघार घेतली आणि अमेरिका महिला संघाची जिम्नॅस्टिकच्या सांघिक स्पर्धेतील दहा वर्षांची अविरत हुकुमत संपुष्टात आली. रशियाने १९९२ च्या बार्सिलोना ऑलिंपिंकनंतर प्रथमच महिला जिम्नॅस्टिकचे सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे.

टोकियो - सिमॉन बाईल्सने अचानक माघार घेतली आणि अमेरिका महिला संघाची जिम्नॅस्टिकच्या सांघिक स्पर्धेतील दहा वर्षांची अविरत हुकुमत संपुष्टात आली. रशियाने १९९२ च्या बार्सिलोना ऑलिंपिंकनंतर प्रथमच महिला जिम्नॅस्टिकचे सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे. 

या स्पर्धेतील पहिल्या व्हॉल्टमध्ये जागतिक तसेच ऑलिंपिक सर्वांगीण विजेती बाईल्स केवळ १३.७६६ गुण नोंदवू शकली. त्यानंतर बाईल्सने माघार घेतली आणि अमेरिकेला मागे टाकत रशियाने सुवर्णपदक जिंकले. 

तत्कालीन सोविएत संघराज्यातून बाहेर पडलेल्या देशांच्या एकत्रित संघाने १९९२ मध्ये बाजी मारली होती. त्यानंतर प्रथमच ते जिंकले, तर ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या हॅट्््ट्रिकची संधी असलेले अमेरिका दुसरे आले. आता एकमेव निराशाजनक प्रयत्नानंतर बाईल्सने सांघिक स्पर्धा सोडली असली, तरी तिला रौप्यपदक देण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या