अमेरिकेची महिला जिम्नॅस्ट कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

अमेरिकेची राखीव महिला जिम्नॅस्ट टोकियो ऑलिंपिकपूर्व सरावानंतर घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीनंतर बाधित असल्याचे निदान झाले आहे. तिचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही. शुक्रवारपासून ती सराव करत आहे.

टोकियो - अमेरिकेची राखीव महिला जिम्नॅस्ट टोकियो ऑलिंपिकपूर्व सरावानंतर घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीनंतर बाधित असल्याचे निदान झाले आहे. तिचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही. शुक्रवारपासून ती सराव करत आहे.

टोकियोत विविध देशांचे खेळाडू जसे येऊ लागले आहेत तसा कोरोनाचाही प्रसार वाढू लागला आहे. विविध देशांचे खेळाडू कोरोना बाधित झाले आहेत. अमेरिका संघातून कोरोना बाधित होणारी ही पहिली खेळाडू आहे.

बाधित झालेल्या या खेळाडूसह तिच्या संपर्कात आलेल्या इतर जणांचे लगेचच विलगीकरण करण्यात आले. अमेरिका संघातील इतर खेळाडू, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या आरोग्याची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे, असे अमेरिका ऑलिंपिक-पॅरालिम्पिक समितीकडून सांगण्यात आले. 

अमेरिकेच्या या जिम्नॅस्टला रविवारी लागण झाल्याचे समजते. सोमवारीही तिची चाचणी करण्यात आली, ही चाचणीही पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचे विलगीकरण करण्यात आले. अमेरिकेचा १० जिम्नॅस्टचा संघ जपानमध्ये आला आहे, त्यांची दररोज चाचणी केली जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या