`विवो`ला विरोध कायम ; सुरू आहे आयपीएलच्या विरोधात 'हा' ट्रेंड

संजय घारपुरे
Monday, 3 August 2020

विवो तसेच अन्य चिनी कंपन्यांचा पुरस्कार कायम ठेवण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आयपीएलचा विरोध वाढत आहे.

नवी दिल्ली : विवो तसेच अन्य चिनी कंपन्यांचा पुरस्कार कायम ठेवण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आयपीएलचा विरोध वाढत आहे. स्वदेशी जागरण मंच, तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी त्यास आक्षेप घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ट्‌वीटरवर बॉयकॉट आयपीएल हा ट्रेंडही लोकप्रिय झाला आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

भारत आणि चीनच्या लष्करात लडाख येथे चकमक झाल्यावर चिनी कंपन्यांना असलेला विरोध वाढला होता. त्या वेळी भारतीय मंडळाने विवोच्या आयपीएल पुरस्कर्ते असण्याबाबत फेरविचार करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र भारतीय मंडळाने विवोच नव्हे, तर ड्रीम इलेव्हन, पेटीएम या पुरस्कर्त्यांना कायम ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही वेळातच समाजमाध्यमांवरून आयपीएल बहिष्काराची हाक देण्यात आली. आपले सैनिक मारलेल्या देशातील पुरस्कर्ते असलेल्या आयपीएलवर बहिष्कार टाकायला हवा. काहींनी आयपीएलचे आपण चाहते आहोत, पण चिनी पुरस्कर्ते असेपर्यंत आयपीएल पाहणार नाही, असे सांगितले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघास संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचने आयपीएल प्रशासकीय समितीने विवोचा पुरस्कार कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. त्यांनी चीनला रोखताना शहीद झालेल्या जवानांचा अवमान केला आहे. सरकार चिनी उत्पादनांना भारताबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या वेळी त्यांना पुरस्कर्ते म्हणून कायम ठेवणे देशाच्या सुरक्षेच्या तसेच आर्थिक प्रश्नाचाही विचार न केल्यासारखे आहे, असे स्वदेशी जागरण मंचाच्या अश्विनी महाजन यांनी सांगितले. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

चीनमधील वस्तूंवर बहिष्काराची हाक देण्यात येते. पण आयपीएलसाठी चीनमधील कंपनीस पुरस्कर्ते म्हणून परवानगी देण्यात येते. चीनमधील पैसा, उत्पादने, पुरस्कर्ते याबाबतचे निर्णय घेताना आपला कसा गोंधळ होतो, हेच चीनला दाखवत आहोत, अशा अर्थाचे ट्‌वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.                


​ ​

संबंधित बातम्या