फक्त विराटच जाऊ शकतो सचिनजवळ: सकलेन

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यातच फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ जाण्याची क्षमता असल्याचे, पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याने म्हटले आहे.

साऊथहँम्पटन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यातच फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ जाण्याची क्षमता असल्याचे, पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याने म्हटले आहे.

सकलेन पीटीआयशी बोलताना म्हणाला, की विराट हा सध्याच्या काळातील एकमेव खेळाडू आहे, जो सचिनच्या महान खेळापर्यंत पोहचू शकतो. फलंदाज म्हणून सचिन खूप मोठा खेळाडू आहे. मी त्याच्याशी कोणाची तुलना करत नाही. पण, विराटमध्ये त्याच्याजवळ पोहचण्याची क्षमता आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. विराटची या मालिकेत कामगिरी चांगली झालेली आहे. सकलेन हा सध्या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा सहाय्यक म्हणून काम पाहतो. विराटच्या खेळाविषयी सकलेन म्हणाला, की तिसऱ्या कसोटीत विराट फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या प्रशिक्षण व्यवस्थापनाशी मी बोललो होतो. जेम्स अँडरसनने अनेकवेळा त्याला चकविले, पण तो पुढचा चेंडू तेवढ्याच आत्मविश्वासाने खेळत होता. त्याची धावांची भूक पाहता तो धावा जमवतच गेला. त्याची धावांची भूक संपतच नाही.


​ ​

संबंधित बातम्या