आयपीएल नव्हे ही लीग लवकरच सुरू होणार

शैलेश नागवेकर
Saturday, 11 July 2020

सहाही संघांचे एकाच हॉटेलमध्ये निवास. हॉटेलमध्ये इतर कोणालाही प्रवेश नसेल. खरे पहायला गेले तर ट्वेन्टी-20 क्रिकेट मध्ये वेस्ट इंडीज खेळाडूंना अधिक पसंती असते वास्तविक ते ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे गतविजेते आहेत.

त्रिनिनाद : क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडने कोरोना महामारीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाही पुढाकार घेतला, पण आंतराराष्ट्रीय क्रिकेट एवढीच लोकप्रियता असलेल्या ट्वेन्टी-20 लीगचा पुन्हा श्रीगणेशा करण्याचा मान कॅरेबियन लीगने मिळवला आहे. 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत ही लीग रंगणार आहे. हा फॉर्म्युला यशस्वी ठरला तर जगभरातील इतर लीगही सुरू होण्यास अडचण येणार नाही. त्रिनिनाद आणि टोबॅगो सरकारचा हिरवा कंदील कॅरेबियन लीग संघटकांनी मिळवला आहे. उपांत्य फेरीचे दोन आणि एक अंतिम सामना असे एकूण 33 सामने दोन स्टेडियममघ्ये प्रेक्षकांविना होणार आहेत.

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

सहा संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांचे त्रिनिनादमध्ये आल्यावर दोन आठवड्यांचे विलगीकरण होईल. त्रिनिनादमध्ये येताच सात दिवसांत दोन कोविड चाचण्या करण्यात येतील. सहाही संघांचे त्रिनिनादमधील एकाच हॉटेलमध्ये निवास. हॉटेलमध्ये इतर कोणालाही प्रवेश नसेल. खरे पहायला गेले तर ट्वेन्टी-२० क्रिकेट मध्ये वेस्ट इंडीज खेळाडूंना अधिक पसंती असते वास्तविक ते ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे गतविजेते आहेत. ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल असे दिग्गज खेळाडू जगभरात आपला डंका वाजवत असतात त्यामुळे ही कॅरेबियन लीग तुफान गाजणार हे नक्की.  या स्पर्धेच्या निमित्ताने त्रिनिनादमध्ये मार्चनंतर प्रथमच बाहेरील व्यक्तींचा प्रवेश होईल. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेले वेस्ट इंडीजचे खेळाडू मायदेशी परतल्यानंतर त्यांचेही दोन आठवड्यांचे विलगीकरण त्यानंतरच ते या लीगमध्ये सहभागी होऊ शकतील.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा   आणि लाइकसह शेअर करायलाही विसरु नका  

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे अन्य खेळासह क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. आयपीएल स्पर्धेसंदर्भातील संभ्रम कायम असताना ऑस्ट्रेलियात रंगणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा ही संकटात सापडली आहे. इंग्लंड -विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावनंतर क्रिकेटला सावरण्यासाठी इंग्लंडच्या निमंत्रणाला मान देऊन विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये रवाना झाला होता. या दोन्ही देशातील कसोटी मालिका प्रेक्षकाविना सुरु आहे. 


​ ​

संबंधित बातम्या