ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या खेळांडूचे यश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत 72 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

कोरोना विषाणूमुळे देश "लॉकडाऊन' केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील क्रिडा स्पर्धा रद्द आहे. त्यातच "द चेसमन' ग्रुपतर्फे ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत औरंगाबादच्या बुद्धिबळपटूंनी वर्चस्व गाजवले.

या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत 72 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गुजरातच्या कर्तव्य अनाडकटने 31 गुणांसह विजेतेपद मिळवीले. प्रथमेश दिनकरने 28 गुणांसह उपविजेतेपद संपादन केले. प्रणव दत्ता, नमीत चव्हाण, जतीन देशपांडे, सानी देशपांडे, कीर्ती एस. बिश्वजित नायक, श्रेयस टिकोटकर यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत औरंगाबादच्या तनीषा बोरामणीकरने तिसरे स्थान मिळवले. तसेच जतीन देशपांडे, सानी देशपांडे, ऋतुजा बक्षी, पुष्कर डोंगरे, इंद्रजित महिंद्रकर, आशिष संकलेचा, प्रथमेश दिनकर, प्रणव दत्ता, तेजस काजळे यांनी आपला ठसा उमटवला. अनुराग जोशी, डॉ. कृष्णा बलदवा, ओम शेलार, कनिष्क कटारिया, सुनील तंबाके, वरद देव यांनीही सहभाग घेतला होता. दुसऱ्या गटात झालेल्या स्पर्धेत कर्नाटकच्या ह्रषिकेशने 36 गुण मिळवीत विजेतेपद मिळवले. या गटात कर्तव्य अनाडकट हा उपविजेता ठरला. तनीषा बोरामणीकरने 32 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. आर्यन रंजन, सुजय आयनॉल, बिश्वजित नायक, नमीत चव्हाण, ऋतुजा बक्षी, कीर्ती, इंद्रजित महिंद्रकर यांना यश मिळाले.

"मुंबई इंडीयन्सच्या ‘हिटमॅन’ शर्माला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा"

दर आठवड्याला स्पर्धा

कोरोनामूळे देशात सुरू असलेले लॉकडाऊन असून अशा परिस्थितीमुळे दर आठवड्याला एकदा मराठवाडा व एकदा औरंगाबादेतील बुद्धिबळपटूंसाठी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजक स्वतंत्रपणे घेणार आहे असे फिडे पंच अभिजित वैष्णव यांनी सांगितले.

 


​ ​

संबंधित बातम्या