Breaking : 2020 मध्ये होणार 'रॅकेट' म्यान; 'वन लास्ट रोअर' म्हणत लिअँडरची निवृत्तीची घोषणा!

वृत्तसंस्था
Wednesday, 25 December 2019

नव्या मोसमात आपण निवडक स्पर्धांत खेळू. जगभरातील मित्र आणि परिचीतांसह जल्लोष करू.

पुणे : एकेरीत ऑलिंपिकपदक जिंकलेला भारताचा देशप्रेमी टेनिसपटू लिअँडर पेस याने 2020 मोसमात निवृत्त होण्याची घोषणा केली. नाताळच्या शुभेच्छा देत त्याने संवाद साधला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'वन लास्ट रोअर' (एक शेवटची डरकाळी) असा हॅशटॅग वापरत पेसने ट्‌वीट केले. त्याने आई-वडिलांच्या मार्गदर्शन, शिस्त, खेळास पूरक वातावरण, निस्सीम प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जॅकी आणि मारिया या दोन बहिणी आधारस्तंभ असल्याचा उल्लेख त्याने केला. मुलगी अयाना हिचेही नाव त्याने घेतले. 

- संघातील स्थानही पक्क नाही तरीही यानं घेतल्या दशकात सर्वाधिक विकेट्स

नव्या मोसमात आपण निवडक स्पर्धांत खेळू. जगभरातील मित्र आणि परिचीतांसह जल्लोष करू. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज आपण लिअँडर पेस बनू शकलो, अशी भावना व्यक्त करीत त्याने सर्वांचे आभार मानले. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर देशाला ऑलिंपिक पदक जिंकून दिलेला पहिला टेनिसपटू अशी लिअँडर पेसची वेगळी आणि अभिमानास्पद ओळख आहे. 

- IPL 2020 : कमिन्सने कोट्यावधी कमाविले अन् गर्लफ्रेंडने लगेच केला 'हा' प्लॅन

पेस विषयी: 

- डेव्हिस कपच्या इतिहासात 44 विजयांसह पेस हा सर्वात यशस्वी दुहेरी टेनिसपटू ठरला आहे. 

- 1996 मध्ये पेसने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. आणि 1952 नंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय टेनिसपटू ठरला.

- 1990 च्या उत्तरार्धानंतर, पेसने महेश भूपतीबरोबर दुहेरीची जोडी बनविली आणि त्यानंतर या जोडीने जगातील अव्वल स्थानही पटकावले.

- 'धाकड गर्ल' गीता फोगटच्या घरी आलाय छोटा 'सांता'!

- पेसने आपल्या कारकीर्दीत 18 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत. आणि यामुळेच तो भारतीय टेनिसपटूचा सर्वात यशस्वी टेनिसपटू मानला जातो.

- 46 वर्षांच्या पेसने यंदा डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या स्पर्धेच्या दुहेरीत त्याने पाकिस्तानवर 4-0 असा विजय मिळविला.

- पुढच्या वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पेसला संधी मिळण्याची शक्यता आहे. जर त्याला संधी मिळाली, तर तो आठवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो.


​ ​

संबंधित बातम्या