ऑलंम्पिक होणार कि नाही ?
जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दिवसागणिक कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट वाढलेले पाहायला मिळतायत. अशात जगभरातील अनेक मोठे कार्यक्रम, जगभरातील अनेक मोठ्या बैठका रद्द होतायत किंवा पुढे ढकललेल्या पाहायला मिळतायत.
अनेक देशांनी कोरोनामुळे आणीबाणी देखील लागू केलीये. इटलीसारखा देश लॉक-डाऊन अवस्थेत आहे. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान आता चर्चा आहे ती जपानमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धांची.

कोरोनाचं सावट ऑलम्पिक स्पर्धांवरही घोंगावतंय. अशात जपानमध्ये ऑलम्पिक स्पर्धेचं आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल असा निर्धार जपानचे पंतप्रधान शिंजो आंबे यांच्याकडून व्यक्त केला जातोय. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आता परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे खरंच ऑलिम्पिक स्पर्धा वेळेवर होणार का पुढे ढकलल्या जाणार याबाबत अजूनतरी प्रशचिन्ह आहे.
ऑलिंपिक्स वर्षभर पुढे ढकला :
कोरोनाची जगभरात दीड लाखांहून अधिकांना लागण झालीये. कोरोनामुळे तब्ब्ल सहा हजारांचे प्राण गेलेत. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाचं ऑलिंपिक्सचं आयोजन हे वर्षभरासाठी पुढे ढकलावं अशी मागणी केलीये. ऑलिम्पिकचं आयोजन हे ठरलेल्या वेळेनुसारच होईल असं जपानचे पंतप्रधान म्हणालेत.