पुण्यात उभारणार ऑलिंपिक भवन अन् आंतराराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ : अजित पवार 

वृत्तसंस्था
Friday, 6 March 2020

याशिवाय पुण्यात ऑलिंपिक भवन उभारणार असल्याचीही घोषणा पवारांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. आता जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटींची निधी दिला आहे. 

पुणे : विधानभवनात सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या संकल्पामध्ये क्रीडा प्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे हा संकल्प सादर करत आहेत. या संकल्पामध्ये क्रीडा विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांनी बालेवाडीमध्ये आतंरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा केली आहे. 

मुलाखतीसाठी बोलावलं नाही तरी अजित आगरकरही निवड समितीत असेल, बघा कसं

बालोवाडीमध्ये सध्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सध्या अनेक नव्या पिढीच्या खेळाडूंना तयार केले जाते. आता याच बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार आहे. या विद्यापीठामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी तयारी करुन घेतली जाईल तसेच क्रीडा प्रकारांचा अभ्यासक्रम करुन घेतला जाईल. 

आधी राष्ट्रीय करारातून माघार घेतली अन् आता कर्णधारपदावर सोडले पाणी

याशिवाय पुण्यात ऑलिंपिक भवन उभारणार असल्याचीही घोषणा पवारांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. आता जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटींची निधी दिला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या