वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने इंग्लडच्या संघाला दिली ‘ही’ ऑफर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असतानाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मात्र इंग्लंड संघाला एक ऑफर दिली आहे. कॅरेबियन बेटावर कोरोनाचा रुग्ण आढळले आहेत. इंग्लंडमधील परिस्थिती अधिक गंभीर आहे. कोरोनामुळे इंग्लंडमध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्व भुमीवर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंड बोर्डास सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये घेण्याची चक्क ऑफर दिली आहे.

लंडन: कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द अथवा स्थगित होत आहेत. बीसीसीआयने भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका रद्द केली. त्यानंतर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली तर सर्व स्थानिक सामने देखील रद्द झाले आहेत.

इंग्लंडने तर श्रीलंकाचा दौरा अर्धवट सोडला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा देखील स्थगित झाली आहे. ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटचे सर्व सामने रद्द झाले आहेत. कोरोना व्हायरसचा धोका कमी होईपर्यंत क्रिकेट सामने स्थगित करण्याचा निर्णय सर्व क्रिकेट बोर्डांनी घेतला आहे. 

एका संकेतस्थळाशी बोलताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकतो, असे नमूद केले. 

वेस्ट इंडिजचा संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. नियोजित वेळेनुसार हा दौरा कोरोना व्हायरसमुळे रद्द होऊ शकतो अथवा पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यामुळेच वेस्ट इंडिज बोर्डाने सामने त्यांच्या देशात खेळण्याची ऑफर दिल्याची शक्याता वर्तवली जात आहे. त्याच बरोबर 30 जुलैपासून पाकिस्तान संघाचा दौरा देखील वेस्ट इंडिजमध्ये घेता येऊ शकेल, असे ग्रेव यांनीच स्पष्ट केले आहे. 

आम्ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी केल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बोलत आहोत. जर वेस्ट इंडिजमध्ये सामने झाले तर आम्ही इंग्लंड बोर्डाचे सर्व प्रसारणाचे आणि व्यवसायिक अधिकार त्यांच्याकडे राहतील याची काळजी घेऊ असेही ग्रेव यांनी नमूद केले आहे. 

कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने इंग्लंड बोर्डाने श्रीलंकेच्या दौऱ्यातून सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलवले होते. तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना तातडीने इंग्लंडमध्ये परतण्यास सांगितले होते.


​ ​

संबंधित बातम्या