कर्णधारपद सोडत नाही म्हणून आता त्याला हाकलून लावणार

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

कर्णधारपदाबद्दल कोणतीही स्पष्टता न आल्यामुळे आता त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात येणार आहे. झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेनंतर बांगलादेशचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमूल हसन यांनी स्पष्ट केले आहे. 

ढाका : एखाद्या संघासाठी त्यांचe सर्वाधिक अनुभवी खेळाडू हा हुकमी एक्का असतो. मात्र, असाच एक खेळाडू त्याच्या संघासाठी मात्र, आता डोकेदुखी ठरु लागला आहे. कर्णधारपद सोडणार की नाही यावर स्पष्ट भूमिका घेत नसल्यामुळे आता त्याच्या संघानेच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार आहे, का बरं?

हा खेळाडू म्हणजे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्ताझा. मोर्ताझाकडून त्याच्या कर्णधारपदाबद्दल कोणतीही स्पष्टता न आल्यामुळे आता त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात येणार आहे. झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेनंतर बांगलादेशचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमूल हसन यांनी स्पष्ट केले आहे. 

Mashrafe Mortazaa, Bangladesh, ODI Series

पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाचे निलंबन, कारण वाचाल तर...

हसन यांनी झिंबाव्बेविरुद्ध होणारी मालिका ही मोर्ताझाची कर्णधार म्हणून अखेरची मालिका असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 2023चा विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेऊन संघबांधळीला सुरवात करण्यात येणार असून एक महिन्यात नवीन कर्णधाराची निवड केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. 

शास्री म्हणतात..सर्व काही सेम सेम; जागवल्या 39 वर्षांपूर्वीच्या आठवणी

तसेच त्यांनी मोर्ताझाला त्याच्या भविष्याबाबत विचार करण्यास सांगतिले असून झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याच्या फिटनेसकडेही जास्त लक्ष दिले जाणार नाही. ते म्हणाले, ''आम्ही तंदुरुस्ती चाचणीवर भर देण्यास सुरवात करणार आहोत आणि मोर्ताझा कदाचित यात नापास होऊ शकतो. जर असे झाले तर आम्ही त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेऊ. बांगलादेश क्रिकेटला चांगले दिवस आणण्यासाठी त्याचे नेतृत्व खूप महत्वाचे होते मात्र, आता त्याने त्याच्या भविष्याचाही विचार करायला हवा. तो आणखी किती दिवस खेळू शकणार आहे याचा त्यानेच विचार करायला हवा.  झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याच्या फिटनेसकडेही जास्त लक्ष दिले जाणार नाही. मात्र, पुढील विश्वकरंडकासाठी आता कमी वेळ राहिला आहे आणि आम्हाला नवा कर्णधार ठरवावा लागेल. झिंबाब्वेविरुद्धच्या मालिकेनंर आम्ही तो निर्णय घेऊ.''

 


​ ​

संबंधित बातम्या