कोरोनामुळे आता टेनिस जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित 

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

कोरोना महामारीच्या आजारामुळे यावर्षीच्या अखेरीस नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणारे डेविस कपचे अंतिम सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आईटीएफ) काल शुक्रवारी डेविस कप फाइनल्स कोरोनामुळे पुढच्या वर्षीपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले. शिवाय स्पर्धेचे आयोजन ठिकाणाबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पूर्वीप्रमाणेच या स्पर्धेचे आयोजन माद्रिद करणार आहे.

...म्हणून विराट, रोहित अन् धोनीला अभूतपूर्व यश मिळालं : हार्दिक पांड्या   

आईटीएफने मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या तार्किक व नियामक आव्हानांचा आढावा घेत, या स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. यासोबतच आयटीएफने  वर्ल्ड ग्रुप १ मधील २४ होम अँड अवे आणि वर्ल्ड ग्रुप 2 च्या ४८ राष्ट्रीय संघातील सामने देखील पुढील वर्षांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे सांगितले आहे.

सेरी ए फुटबॉल चैंपियनशिप : जुवेंटस संघाची लिसवर मात    

त्यामुळे वर्ल्ड ग्रुप वन आणि वर्ल्ड ग्रुप या दोन्हीच्या सुरवातीचे सामने पुढील वर्षाच्या मार्च किंवा सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर डेविस कप फायनल्स २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. तसेच २०२० मध्ये फायनलसाठी पात्र ठरलेल्या १८ देशांना २०२१ मध्ये स्थान देण्यात येणार असल्याचे आईटीएफने सांगितले. याव्यतिरिक्त आयटीएफने यावर्षीचा महिला फेड कप पुढे ढकलला आहे. आणि तो पुढील वर्षीच्या १३ ते १८ एप्रिल दरम्यान बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात येणार आहे.                 

​ ​

संबंधित बातम्या