आता फॉर्म्युला वन गाड्यांचा आवाज पुन्हा घुमणार 

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा पूर्णपणे थांबवण्यात आल्या होत्या. यानंतर तब्ब्ल तीन महिन्यांनी कोरोनाची खबरदारी घेत खेळाडू पुन्हा मैदानावर उतरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल लीगचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता फॉर्म्युला वन गाड्यांचा आवाज पुन्हा ऐकू येणार आहे. या आठवड्यापासून ऑस्ट्रियामध्ये फॉर्म्युला वन रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, मात्र कोरोनाच्या खबरदारी म्हणून इतर खेळांप्रमाणेच या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. 

क्रिकेट जगताला धक्का, कोरोनामुळे संजय डोबाल यांनी गमावला जीव

फॉर्म्युला वन रेसिंगचा हंगाम कोरोनामुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा चार महिन्यांनी फॉर्म्युला वन रेसिंग सुरु होणार आहे. फॉर्म्युला वन रेसिंगचा  हंगाम मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रा प्रि स्पर्धेपासून सुरू होत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यास्पर्धेत सलग सहा वेळा जिंकलेला फॉर्म्युला वन चॅम्पियन लुई हॅमिल्टन हा फरारीचा दिग्गज मायकेल शुमाकर याच्या सात विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.      

फॉर्म्युला वनने कोरोना-प्रभावित हंगामात बदल करण्याचे मान्य केले होते. व 2021 मधील हंगामासाठी वाहनचालकांची घोषणा केली होती. मात्र यावेळेस सुरवातीच्या सात स्पर्धा रद्द केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या मोसमात किती शर्यती होणार आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. उर्वरित आठ फेऱ्या युरोपमध्ये प्रथमच प्रेक्षकांशिवाय होणार आहेत.

टीम इंडिया 'या' महिन्यानंतर उतरणार मैदानात 

या हंगामाची पहिली फॉर्म्युला वन रेस जुलै महिन्यातील येत्या रविवारी 4 तारखेला ऑस्ट्रियामध्ये रेड बुल रिंग येथे होणार असून, या सर्किटवर त्याच्या पुढील आठवड्यात देखील होणाऱ्या दुसर्‍या रेसिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे रेड बुल रिंग एकाच हंगामात दोन शर्यती आयोजित करणारे पहिले सर्किट ठरणार आहे.                

​ ​

संबंधित बातम्या