...तर भारतात आता पावसात देखील क्रिकेटचा सामना रंगल्याचे दिसेल!   

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

अहमदाबाद जवळील मोटेरा येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन फेब्रुवारी मध्ये झाले. मात्र पावसाचा व्यत्यय आल्यामुळे अनेकदा भारतातील क्रिकेटचे सामने स्थगित करण्याची वेळ आली होती. पण आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने 'भारत आणि क्रिकेट' या विषयावर बोलताना ब्राझील हा देश ज्याप्रमाणे फुटबॉल साठी ओळखला जातो, त्याप्रमाणेच भारत हा क्रिकेट साठी ओळखला जात असल्याचे म्हटले होते. देशात अधिकतर लोकांचा आवडता खेळ क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट साठी उपयुक्त आणि आधुनिक स्टेडियम भारतातील अनेक शहरात आहेत. नुकतेच अहमदाबाद जवळील मोटेरा येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन फेब्रुवारी मध्ये झाले. मात्र पावसाचा व्यत्यय आल्यामुळे अनेकदा भारतातील क्रिकेटचे सामने स्थगित करण्याची वेळ आली होती. पण आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे. कारण पंजाब क्रिकेट असोसिएशनने चंदीगडमध्ये बनविलेले जगातील पहिले हायटेक स्टेडियम लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या स्टेडियम मध्ये पावसाच्या वेळेस देखील सामना चालू ठेवता येणार आहे.      

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहेत का ? 

पंजाब क्रिकेट असोसिएशनने चंदीगड येथील मुल्लांपूर आंतरराष्ट्रीय  क्रिकेट स्टेडियम ग्रीन बिल्डिंग अंतर्गत बांधले आहे. 150 कोटी खर्च करून आठ लाख चौरस फूट जागेत बांधण्यात आलेले हे स्टेडियम मोहाली येथील आइएस बिंद्रा स्टेडियम पेक्षा तीन पटीने मोठे आहे. शिवाय जगभरातील अन्य आधुनिक स्टेडियम पेक्षा हे वेगळे आहे. सौर ऊर्जेचा वापर करून वीजपुरवठ्याची सुविधा या स्टेडियम मध्ये करण्यात आली असून, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही सिस्टिम देखील करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण स्टेडियमवर छत असल्यामुळे पावसात देखील सामने सुरु ठेवता येणार आहेत. त्यामुळे हे स्टेडियम अहमदाबाद जवळील मोटेरा या स्टेडियम पेक्षा आधुनिक असणार आहे.  

कोरोनामुळे आता बुद्धिबळ जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित              

चंदीगड येथील या क्रिकेट स्टेडियमचे 90 टक्के काम झाले पूर्ण असून, ऑगस्ट  2020 पर्यंत उर्वरित काम संपणार होते. मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे पुढील वर्षाच्या मार्च 2021 पर्यंत हे स्टेडियम बांधून पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी  भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे काही सामने या स्टेडियम मध्ये खेळवण्यात येऊ शकतात.      

 


​ ​

संबंधित बातम्या