आयपीएलसाठी आता राष्ट्रीय शिबिराचाही बळी?

संजय घारपुरे
Monday, 27 July 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या आयपीएलच्या व्यतिरीक्त कसलाही विचार करण्यास तयार नाही. या लीगसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांचा बळी दिल्यानंतर आता राष्ट्रीय शिबिराचाही बळी देण्याबाबत विचार केला जात आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या आयपीएलच्या व्यतिरीक्त कसलाही विचार करण्यास तयार नाही. या लीगसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांचा बळी दिल्यानंतर आता राष्ट्रीय शिबिराचाही बळी देण्याबाबत विचार केला जात आहे. 

ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत 

भारतीय खेळाडू मार्चपासून मैदानावर उतरलेले नाहीत. आयपीएल संपल्यावर लगेचच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यापूर्वी संघाचे शिबिर घेण्यासाठी आग्रह केला जात होता आणि त्यानुसार मोटेरा येथे शिबिर घेण्याचीही तयारी केली जात होती. मात्र आता आयपीएल फ्रँचाईजना आपल्या खेळाडूंचे दोन आठवड्याचे शिबिर घ्यायचे आहे, त्यामुळे राष्ट्रीय शिबिरासाठी आता वेळ नाही असे कारण दिले जात आहे. 

आयपीएलमधील काही फ्रँचाईजी दुबईत शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. खेळाडू दिर्घकाळ मैदानात उतरले नसल्याने हे शिबिर आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे आणि ते पटण्यासारखेही आहे, असे भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले. भारतीय संघाच्या शिबिराबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण वेळ फार कमी आहे, याकडेही सर्वांनी लक्ष द्यायला हवे असेही त्यांनी सांगितले. फ्रँचाईजनी आम्ही 6 सप्टेंबरपासून दुबईत शिबिर घेण्याचा विचार करीत असल्याचे संकेत दिले आहेत. 

पुढील वर्षाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजकांनी घेतले मोठे निर्णय 

आता कोरोना महामारी असताना स्पर्धा तसेच शिबिर घेण्यासाठी असलेले नियम लक्षात घेतल्यास शिबिरातील खेळाडूंना ऑगस्टच्या अखेरीसच दुबईत दाखल व्हावे लागेल. या परिस्थितीत भारतीय संघाचे शिबिर कसे होणार हा प्रश्नच आहे.


​ ​

संबंधित बातम्या