कोरोनामुळे आता फुटबॉल मधील 'ही' स्पर्धा रद्द 

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

कोरोना महामारीच्या आजारामुळे यावर्षी खेळ जगतावर मोठे संकट कोसळले आहे. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत यूरोपातील तसेच इत्तर काही देशांनी स्थानिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरु केले. मात्र सर्व उपाययोजना केल्यानंतर देखील क्रीडा जगतात कोरोनाचा काही प्रमाणात शिरकाव झाला. त्यामुळे खेळ संघटनांनी आपल्या काही स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढच्या वर्षी कॅमेरून येथे होणारी आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या आजारामुळे यावर्षी खेळ जगतावर मोठे संकट कोसळले आहे. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत यूरोपातील तसेच इत्तर काही देशांनी स्थानिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरु केले. मात्र सर्व उपाययोजना केल्यानंतर देखील क्रीडा जगतात कोरोनाचा काही प्रमाणात शिरकाव झाला. त्यामुळे खेळ संघटनांनी आपल्या काही स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढच्या वर्षी कॅमेरून येथे होणारी आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

#वर्णभेदाचा_खेळ :विंडीजचा संघ कॉलर 'टाइट' करुन 'फाइट' देणार 

कोरोनाच्या संकटामुळे जगभरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कन्फेडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉलने (सीएएफ) काल मंगळवारी, कॅमेरून येथे 2021 मध्ये नियोजित असलेल्या आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेला 2022 पर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सीएएफचे अध्यक्ष अहमद अहमद यांनी, आफ्रिकन फुटबॉलच्या नियामक मंडळाने आरोग्यास प्राधान्य देण्याचे ठरवत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणाऱ्या महिला कप ऑफ नेशन्स स्पर्धा देखील रद्द करण्यात येत असल्याचे अहमद अहमद यांनी म्हटले आहे.  

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन

सीएएफ चॅम्पियन्स लीगचे सामने यावर्षी सप्टेंबर मध्ये सुरू होणार होते. तर कन्फेडरेशन चषक वर्षाच्या अखेरीस खेळवण्यात येणार होता. दक्षिण आफ्रिकेच्या देशांमध्ये आत्तापर्यंत 1 लाख 51हजार 209 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 हजार 657 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर आफ्रिकेत इजिप्त मध्ये सर्वात जास्त 68 हजार 311 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आणि 2 हजार 953 लोकांचा मृत्यू इजिप्त मध्ये झाला आहे.   

 

 


​ ​

संबंधित बातम्या