US Open : अंतिम फेरीतील विजयासह जोकोविचचे 14 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद 

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आज अमेरिन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रोला पराभूत करत स्पर्धेचे विजेतपद पटकावले. हे त्याचे 14 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे.

न्यूयॉर्क : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आज अमेरिन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रोला पराभूत करत स्पर्धेचे विजेतपद पटकावले. हे त्याचे 14 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे. या विजयासह त्याने पीट सॅम्प्रास यांच्या 14 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  

जोकोविचचने पोट्रोला 6-3, 7-6(7/4), 6-3 अशा फरकाने पराभूत करत तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. जोकोविच सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा 20 वि़जेतेपदांसह पहिल्या तर स्पेनचा रॅफेल नदाल 17 विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

जोकोविचने जुलै महिन्यात विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. सलग दोन ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावल्याने त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पोट्रोच्या कारकिर्दीतील ही पहिली ग्रॅंड स्लॅम अंतिम लढत होती. त्याने 2009 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तसेच 2015 मध्ये त्याने मनगटाच्या दुखापतीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. 

विजेतेपद पटकावल्यावर जोकोविचने आपल्या जिवलग मित्राला मिठी मारली. त्यानंतर त्याने पत्नी आणि आपल्या सहकाऱ्यांसह कोर्टवर आनंद साजरा केला तर, दुसरीकडे आपल्या खुर्चीत बसलेल्या पोट्रोला अश्रू अनावर झाले. 

''सध्या मला काहीही बोलणे शक्य नाही, मला वाईट वाटत असले तरी मी नोव्हाकसाठी आनंदी आहे.''
- ज्युआन मार्टीन डेल पोट्रो   

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports


​ ​

संबंधित बातम्या