US Open : मिलमन फेडररवर वरचढ, मात्र जोकोविचसमोर शरणागत

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पराभूत करणाऱ्या जॉन मिलमनविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पराभूत करणाऱ्या जॉन मिलमनविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

दिग्गज रॉजर फेडररला पराभूत करत मिलमनने पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जोकोविचने त्याचा 2 तास 48 मिनिटांत सरळ सेटमध्ये 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. या विजयासह जोकोविचने सलग 11 वेळा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

 अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत खेळाडूंच्या कामगिरीशिवाय उष्ण वातावरणाचीही सर्वाधिक चर्ची रंगली आहे. जोकोविच आणि मिलमन यांच्याचील सामन्यादरम्यान ऊन कमी होते, मात्र हवा प्रचंड दमट होती. मिलमन घामाने संपूर्ण भिजल्याने त्याने सेटच्या मध्ये शर्ट बदल्यासाठी परवानगी मागितली आणि त्याला ती देण्यातही आली. सेट सुरु असताना कोणत्याही खेळाडूला अशी परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ होती. 

जोकोविचसमोर उपांत्य फेरीत जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान असणार आहे. निशिकोरीने सातव्या मानांकित मारिन सिलिचवर 2-6, 6-4, 7-6 (7/5), 4-6, 6-4 असा विजय मिळवला. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीत राफेल नदाल आणि ज्युआन डेल पोट्रो यांच्यात चुरस रंगणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या