'...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

टीम ई-सकाळ
Monday, 8 June 2020

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धेवरही संकट कोसळले आहे. ही स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करुन बीसीसीआयने शेवटपर्यंत स्पर्धा घेण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत.

मुंबई :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जन-जीवन विस्कळीत झाले आहे. याचा क्रिडा जगतालाही मोठा फटका बसलाय. जगातील मानाची असलेली ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा आणि अन्य खेळासोबतच भारतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. यातून सावरत फुटबॉलच्या माध्यमातून युरोपातून खेळाला हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. मात्र ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत अनेक तर्कवितर्क लढत आहेत. ही स्पर्धा झाली तरी ऑस्ट्रेलियाला तोटा सहन करावा लागणार आहे. आणि रद्द झाली तर नुकसान आणखी वाढणार आहे. या परिस्थितीत स्पर्धेबाबत कोणता निर्णय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

#वर्णभेदाचा _खेळ : या खेळाडूच्या प्रतिस्पर्धी बोर्डानेच दुखावल्या होत्या भावना

देशव्यापी लॉकडाउनसोबत आयपीएलचे काउंटडाउन वाढतानाचे चित्र या दरम्यान पाहायला मिळते. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धेवरही संकट कोसळले आहे. ही स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करुन बीसीसीआयने शेवटपर्यंत स्पर्धा घेण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या विश्वचषकासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आयपीएल स्पर्धेवरील संकट टळेल अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. 

पाकच्या या क्रिकेटरला टिम इंडियाच्या ताफ्यासोबत फिरायचंय

वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज मयकल होल्डिंग यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल स्पर्धा भरवण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जर टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल स्पर्धा घेण्याचा बीसीसीआयला अधिका प्राप्त होईल, यावरही त्यांनी भर दिला. 18 आक्टोंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा नियोजित आहे. पण सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा घेणे शक्य वाटत नाही, अशी भूमिका ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने यापूर्वी बोलून दाखवली आहे. स्पर्धा घ्यायचीच ठरवली तर ती प्रेक्षकांशिवाय घ्यावे लागेल. एवढेच नाही तर कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करताना नियोजित खर्च वाढू शकतो. आर्थिक संकट टाळण्याच्या उद्देशाने स्पर्धा स्थगित करण्यात येऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. जर असे झाले तर बीसीसीआय आयपीएलसंदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या