विराट नव्हे तर, धोनीच नंबर वन ब्रँड

टीम ई-सकाळ
Sunday, 16 August 2020

क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर देखील चाहत्यांमध्ये माहीची लोकप्रियता कायम.

भारतीय क्रिकेट मधेच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतात छाप सोडणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने काल शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे एम एस धोनी आता भारतीय क्रिकेट संघापासून दूर झाला आहे. मात्र जेव्हा सर्वात जास्त ब्रँडचा विचार केला जातो त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी आज देखील वर्तमान कर्णधार विराट कोहलीपेक्षा पुढे आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतल्यानंतर धोनीच्या ब्रँड आणि जाहिरात मधील मूल्य खाली आले आहे. सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहली एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी दररोज सुमारे चार कोटी रुपये घेतो. तर मिळालेल्या माहितीनुसार एम एस धोनी प्रत्येक जाहिरातीच्या शूटिंगसाठी दिवसाला  45 ते 50 लाख रुपये मानधन आकारतो. मात्र ब्रँड व जाहिरातींची संख्या एम एस धोनीकडे विराट कोहलीपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउन नंतर महेंद्रसिंग धोनीने नवीन व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर आता काही ब्रँड्सकडून मिळणारी रक्कम अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे. तर काही ब्रँड्स देखील कमी झाले आहेत. परंतु असे असूनही धोनीबरोबर काही नवीन ब्रँड जोडले गेले आहेत. सध्या धोनीकडे मास्टरकार्ड, नेटमेंडस, कार 24, इंडियन टेरिन, रेडबस, इंडियन आर्म, पन्नाई अशोक लेलँड, स्नीकर्स, ड्रीम 11, इंडिगो पेंट्स यासह इतर अनेक ब्रँड आहेत. तर याअगोदर 2011 विश्वचषक स्पर्धेदरम्यान एमएस धोनी दरवर्षी प्रति जाहिरातीसाठी सुमारे सहा कोटी रुपये आकारत होता. तसेच त्यावेळेस धोनीकडे बरेच मोठे  ब्रँड्स होते. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

धोनीकडे सध्याच्या घडीला 44 ब्रँड असल्याचे एका खेळाडूंचे व्यवस्थापन करणाऱ्या संचालकांनी म्हटले आहे. तसेच क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर देखील चाहत्यांमध्ये माहीची लोकप्रियता कायम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर विराट कोहलीकडे सध्या 43 जाहिराती आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या