क्रिकेट_डायरी: विश्वविजेता ठरणे एवढेच नव्हे तर ही अविस्मरणीय घटनाही आजच्याच दिवशी घडली होती..

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

त्यामुळे २५ जून ही तारीख भारतीय क्रिकेट साठी सुवर्णच म्हणावी लागेल.

२५ जून ही तारीख भारतीय क्रिकेट इतिहासातील अविस्मरणीय दिवसाची साक्ष देणारी आहे. या दिवशी क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाने दोन अभूतपूर्व विक्रमाची  नोंद  केली आहे.  २५ जून १९८३ रोजी भारतीय क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. यापूर्वी २५ जून लाच १९३२ रोजी भारतीय संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे २५ जून ही तारीख भारतीय क्रिकेट साठी सुवर्णच म्हणावी लागेल.

आजच्या घडीला भारतीय संघाचा क्रिकेट मधील तीनही प्रकारात दबदबा आहे. सध्याला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या नंबरवर आहे. तर एकदिवसीय सामन्यातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून,  क्रिकेटच्या जलद प्रकारातील टी२० मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय  भारतीय क्रिकेट संघाने १९८३ च्या व्यतिरिक्त २०११ मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय सामन्यातील विश्वचषक आपल्या खिशात घातला. आणि त्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी२० सामन्यांच्या विश्वचषकावर व २०१३ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले होते. मात्र भारतीय संघाचे क्रिकेट मधील पदार्पण आणि त्यानंतर पुढची वाटचाल याची माहिती अनेकांना फार कमी लोकांना माहित आहे. 

आता भारतीय क्रिकेट संघातील 'या' खेळाडूने सुरु केला सराव 

भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना रणजितसिंहजी व के.एस. दुलीपसिंहजी यांच्यासह, फार कमी खेळाडूंनी भारतीय इंग्रजी क्रिकेट संघाचे सदस्य म्हणून सहभाग क्रिकेट मध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांच्यापैकीच पटियाळाचे महाराज भूपिंदर सिंग हे एक होते. क्रिकेटचे मोठे चाहते असलेले भूपिंदर सिंग यांनी पटियाळाची स्वतंत्र्य टीम तयार केली होती. त्यांना क्रिकेटचे एवढे वेढ होते की, आपल्या राज्यानंतर क्रिकेट खेळाला ते दुसरे महत्वाचे स्थान देत असत. त्यांनी  क्रिकेटसाठी अनेक दौरे आणि विविध स्पर्धा स्वत: च्या पैशाने प्रायोजित केल्या होत्या. १९११ मध्ये इंग्लंडला गेलेल्या भारतीय इंग्रजी क्रिकेट संघाचे नेतृत्व भूपिंदर सिंग यांनी केले होते. तसेच १९२६-२७ च्या क्रिकेट हंगामात भूपिंदर सिंग यांनी मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे सदस्य म्हणून खेळात सहभाग होता. यानंतर भूपिंदर सिंग यांची निवड १९३२ च्या पहिल्या इंग्लंड कसोटी दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधार म्हणून झाली होती. मात्र आरोग्याच्या कारणास्तव त्यांना या दौऱ्यासाठी जाता आले नाही. आणि त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व पोरबंदरचे महाराज नटवरसिंहजी यांच्याकडे आले. 

यानंतर २५ जून १९३२ ला भारतीय संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण करत, कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेला भारत सहावा संघ बनला. यावेळेस नटवरसिंहजी यांनी काही काळानंतर भारतीय संघाचे नेतृत्व सी के नायडू यांच्या हाती सोपवले. आपल्या पहिल्या वाहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. मात्र तरीदेखील या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. क्रिकेटची   पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा  फलंदाजी करताना पहिल्या डावात २५८ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाचा पहिला डाव १८९ धावांत आटोपला होता. ज्यामध्ये सी के नायडू यांनी सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने २७५ धावा करत भारतासमोर ३४६ धावांचे लक्ष ठेवले होते. त्यानंतर या लक्षाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७७ धावांवर आटोपला. 

आयपीएलला खो घालण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने खेळला हा डाव

त्यानंतर २५ जून १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला होता. सलग तिसऱ्या वेळेस विश्वचषक मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला अंतिम सामन्यात धूळ चारत भारतीय संघाने इतिहास रचला होता. या सामन्यात भारतीय संघाने पहिली फलंदाजी करताना १८३ धावांचे लक्ष प्रतिस्पर्धी संघ वेस्ट इंडिजला दिले होते. व यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला १४० धावांपर्यंत रोखत, ४३ धावांच्या फरकाने पराभव केला होता. या सामन्यात भारताकडून के. श्रीकांत यांनी ३८ अशा सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर मोहिंदर अमरनाथ आणि एस मदनलाल या खेळाडूंनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या.

 


​ ​

संबंधित बातम्या