कोरियाच्या दोन्ही संघांचा एशियाडसाठी संयुक्त सराव 

वृत्तसंस्था
Sunday, 29 July 2018

कॅनोईंग, रोईंग तसेच महिला बास्केटबॉलमध्ये कोरियाचा संयुक्त संघ असेल. या तीन संघांचा एकत्रित सरावासाठी उत्तर कोरियातून 34 जणांचे पथक दक्षिण कोरियात दाखल झाले. अर्थात त्यांचा उत्तर कोरिया ते इनचॉन हा हवाई प्रवास मात्र व्हाया बीजिंग झाला.

सोल : दक्षिण आणि उत्तर कोरियाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील संयुक्‍त संघ खेळवण्याच्या दिशेने भक्कम पाऊल उचलताना संघाच्या संयुक्त सरावाचा कार्यक्रम तयार केला, एवढेच नव्हे तर उत्तर कोरियाचे खेळाडू संयुक्त सरावासाठी दक्षिण कोरियात दाखलही झाले आहेत.

कॅनोईंग, रोईंग तसेच महिला बास्केटबॉलमध्ये कोरियाचा संयुक्त संघ असेल. या तीन संघांचा एकत्रित सरावासाठी उत्तर कोरियातून 34 जणांचे पथक दक्षिण कोरियात दाखल झाले. अर्थात त्यांचा उत्तर कोरिया ते इनचॉन हा हवाई प्रवास मात्र व्हाया बीजिंग झाला. दोन्ही संघांच्या संयुक्त सरावाचा एकत्रित कार्यक्रम अद्याप निश्‍चित नाही, पण हा सराव पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील संघर्ष पन्नास वर्षाहून जुना आहे. एप्रिलमध्ये दोन देशांच्या प्रमुखात झालेल्या चर्चेनुसार संयुक्त पथक आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी होईल. फेब्रुवारीत दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिंपिकसाठी उत्तर कोरियाने पथक पाठवले आणि तेव्हापासून दोन देशांतील क्रीडा संबंध सुधारण्यास मदत झाली.

संबंधित बातम्या