Thailand Open: कोचसह स्टाफ मेंबरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

जवळपास 10 दिवस त्यांना रुग्णालयात रहावे लागणार आहे. यादरम्यान त्यांच्या टेस्ट आणि योग्य ते उपचार देण्यात येतील अशी माहिती देखील बीएफडब्लूने दिली आहे. 

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.  जागतिक बॅडमिंटन असोसिएशनने (BWF) यासंदर्भात माहिती दिलीय. जर्मनी संघाचे कोच आणि फ्रान्सच्या स्टाफ सदस्यांमधी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 10 दिवस त्यांना रुग्णालयात रहावे लागणार आहे. यादरम्यान त्यांच्या टेस्ट आणि योग्य ते उपचार देण्यात येतील अशी माहिती देखील बीएफडब्लूने दिली आहे. 

कोरोना काळात होत असलेल्या स्पर्धेसाठी कठोर नियमाचे पालन केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत, असे थायलंड बॅडमिंटन असोसिएशन स्पष्ट केले आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि  एच एस प्रणोय यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली होती. 

Syed Mushtaq Ali T20 : सात वर्षानंतरही तेवर कायम; श्रीसंतनं झोकात केलं कमबॅक (VIDEO)

मात्र त्यांचे रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आल्याने त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. 
याशिवाय किदाम्बी श्रीकांतनेही थायलंडमधील चाचणीसंदर्भात भयावह अनुभव शेअर केला. होता. चाचणीदरम्यान नाकातून झालेल्या रक्तस्त्रावाचे फोटो त्याने शेअर केले होते. या सर्व घटनेनंतर सायनासह श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूचे आव्हान मात्र पहिल्या फेरीत संपुष्टात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या