रोहित-विराट 'वाटणीवर'; कपिलपाजींचा 'कल्चर' स्ट्रोक

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्प्लिट कॅप्टन्सीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीत दोन CEO असू शकत नाहीत. त्याप्रमाणेच भारतीय संघातह  दोन वेगवेगळ्या कर्णधाराचा विचार पटत नाही.  ‘एचटी लीडरशिप समिट’च्या ऑनलाईन चर्चा सत्रात त्यांनी भाग घेतला होता.  यावेळी त्यांनी एका संघाला दोन कर्णधार ही आपली संस्कृतीच नाही, असे भाष्य केले.  

भारतीय संघाच्या वेगवेगळ्या प्रकारातील नेतृत्व विभागून द्यायला हवे, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा  जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे टी-20 संघाचे नेतृत्व द्यावी, अशी मागणी होत आहे. वनडे आणि कसोटीचे नेतृत्व विराट कोहलीकडे कायम ठेवावे आणि झटपट क्रिकेटची धूरा रोहितकडे असावे, असे मत अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी व्यक्त केले आहे. पण भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने याला विरोध दर्शवलाय. 

ऑस्ट्रेलिया संघात रिचर्डसनऐवजी टाय

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्प्लिट कॅप्टन्सीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीत दोन CEO असू शकत नाहीत. त्याप्रमाणेच भारतीय संघातह  दोन वेगवेगळ्या कर्णधाराचा विचार पटत नाही.  ‘एचटी लीडरशिप समिट’च्या ऑनलाईन चर्चा सत्रात त्यांनी भाग घेतला होता.  यावेळी त्यांनी एका संघाला दोन कर्णधार ही आपली संस्कृतीच नाही, असे भाष्य केले.  

विराटच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी अस्थिर: पाँटिंग

ते म्हणाले की, आपल्या संस्कृतीमध्ये असे शक्य नाही. कोहली टी-20 खेळतोय. त्याच्या नेतृत्वाखाली संघही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यालाच नेतृत्वाची धूरा सांभाळू द्या, असा सल्लाही कपिल देव यांनी दिलाय. आयपीएलच्या हंगामात रोहित शर्माचे नेतृत्व कोहलीपेक्षा भारी ठरले आहे. 2013 पासून कोहली बंगळुरुचे तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. एका बाजूला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा जेतेपद पटकावले. दुसरीकडे विराट कोहलीचा संघ प्रत्येक हंगामात फ्लॉप ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयपीएलच्या हंगामातील दोघांच्या नेतृत्वावरुन सध्या वाद विवाद रंगला आहे.

​ ​

संबंधित बातम्या