यूस, फ्रेंच नंतर कोलोन टेनिस स्पर्धेत अँडी मरेचा पहिल्या फेरीतच पराभव   

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम नंतर कोलोन इंडोर टेनिस स्पर्धेत देखील अँडी मरेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम नंतर कोलोन इंडोर टेनिस स्पर्धेत देखील अँडी मरेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अँडी मरे कोलोन इंडोर टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत फर्नांडो व्हर्डास्कोकडून पराभूत झाला आहे. अँडी मरे आणि फर्नांडो व्हर्डास्को यांच्यात झालेल्या सामन्यात अँडी मरेला खराब सर्विसचा फटका बसला. आणि याचाच फायदा फर्नांडो व्हर्डास्कोने घेत या सामन्यात 6-4, 6-4 ने विजय मिळवला. 

गोलंदाजांमुळेच जिंकलो ; शिखरकडून रबाडा आणि नॉर्टीजेचे कौतुक

माजी जागतिक अव्वल टेनिसपटू असलेल्या अँडी मरेची सर्विस फर्नांडो व्हर्डास्कोने चार वेळा मोडत संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. यापूर्वी अँडी मरेला यूएस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आणि फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यूएस आणि फ्रेंच ओपन मध्ये अँडी मरेला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता. त्यानंतर आता कोलोन इंडोर टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत देखील मरेचा पराभव झाल्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच अँडी मरेला कोलोन इंडोर टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली आहे. 

बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीस रोनाल्डो मुकण्याची शक्‍यता 

फर्नांडो व्हर्डास्कोचा सामना आता पुढील फेरीत अलेक्झांडर ज्वेरेव सोबत होणार आहे. जर्मनीच्या ज्वेरेवला पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला होता. त्यानंतर महिला एकेरीत क्रोएशियाच्या आठव्या मानांकित मरिन सिलिचने मार्कोस गिरॉनचा 6-2, 4-6, 6-3 ने पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे. आता तिची पुढील लढत अलेक्झांड्रा डेव्हिडोविच फोकिनाशी होणार आहे.            

 

 


​ ​

संबंधित बातम्या